लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटीच्या बनावट कार्डाला आळा घालून बोगसगिरीला पायबंद घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी यावर्षीपासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. सदर योजनेची गडचिरोली आगारात अंमलबजावणी करण्यात येत असून ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड वितरणाचे काम सुरू झाले आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी गडचिरोलीच्या आगारात गर्दी केली होती.शासनाने विविध सामाजिक घटकांना महामंडळाच्या एसटीमधूून प्रवासाची सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी सवलतीचे साधे कार्ड मिळत असल्याने बनावट कार्ड बनवून अनेकजण एसटीच्या या योजनेचा लाभ घेतल्याचे उजेडात आले. सदर प्रकार परिवहन मंत्री व अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा विचार करण्यात आला. त्यानंतर परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजना जाहीर केली.या योजनेची महाराष्ट्राच्या सर्व आगारात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली आगारातर्फेही सदर योजना राबविली जात असून येथे ज्येष्ठ नागरिकांना कार्ड वितरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नाव नोंदणीच्या वेळी स्मार्ट कार्डसाठी प्रत्येकी ५५ रुपये शुल्क आकारल्या जात आहे. सदर योजनेच्या नोंदणीसाठी वयाचा पुरावा, महाराष्ट्राचे नागरिक असल्याचा पुरावा सोबत आणावा लागत आहे. यात वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र व पासपोर्ट आदी कोणत्याही पुराव्यांपैकी एक तसेच आधारकार्ड गरजेचे असल्याचे एसटी आगार प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांची नाव नोंदणी आगारातील आरक्षण खिडकीवर करण्यात येत आहे. अंगठ्याचा ठसा स्कॅनवर ठेवून आधारकार्डशी संलग्न माहिती दिल्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर १५ दिवसांनी त्याच ठिकाणी या योजनेचे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.ज्येष्ठांना ५० टक्के सूटस्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत वयाचे ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. अशा प्रकारची सवलत घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ग्रामीण भागात मोठी आहे. यापुढे स्मार्ट कार्ड दाखविल्याशिवाय ज्येष्ठांना प्रवासात सवलत मिळणार नाही. यापूर्वी आधारकार्ड अथवा वयाचा कोणताही पुरावा दाखविल्यास वाहक सूट देत होते.
स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिक सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:16 IST
एसटीच्या बनावट कार्डाला आळा घालून बोगसगिरीला पायबंद घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी यावर्षीपासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. सदर योजनेची गडचिरोली आगारात अंमलबजावणी करण्यात येत असून ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड वितरणाचे काम सुरू झाले आहे.
स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिक सरसावले
ठळक मुद्देएसटी महामंडळाची योजना : गडचिरोली आगारात गर्दी, बनावट कार्डांना बसणार आळा