शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंप्रेरणेने तरुणांनी आखला यशाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:44 IST

बारा वर्षांपूर्वी तालुक्यातील कुरूड गावच्या तरुणांनी गावात कसल्याही सुविधा नसतांना आरडाओरड केली नाही. फक्त उमेद, समध्येयाने प्रेरित मित्रांची एकी या बळावर वडसा ते आरमोरी रोडबाजूच्या जेजाणी पेपरमिल जवळील मोकळ्या जागेवर शारीरिक व्यायाम करण्यासाठी स्वखर्चाने तात्पुरती धावपट्टी, गोळाफेक, उंच उडी टाकी तयार केली.

ठळक मुद्देसरावासाठी तयार केले मैैदान : १२ वर्षात अनेकजण परिश्रमाने दाखल झाले पोलीस व सैैन्यात

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : बारा वर्षांपूर्वी तालुक्यातील कुरूड गावच्या तरुणांनी गावात कसल्याही सुविधा नसतांना आरडाओरड केली नाही. फक्त उमेद, समध्येयाने प्रेरित मित्रांची एकी या बळावर वडसा ते आरमोरी रोडबाजूच्या जेजाणी पेपरमिल जवळील मोकळ्या जागेवर शारीरिक व्यायाम करण्यासाठी स्वखर्चाने तात्पुरती धावपट्टी, गोळाफेक, उंच उडी टाकी तयार केली. आणि बघताबघता बारा वर्षात एक तरुणी आणि चौदा तरुण असे पंधरा तरुण आर्मी, पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफमध्ये रुजू होऊन देशसेवा करीत आहेत.आजतागायत कुरूड, जुनी वडसा, नैनपूर आणि शिवराजपूर येथील २० ते २५ मुले-मुली दररोज सकाळ-सायंकाळ याठिकाणी सरावासाठी येतात आणि झपाटल्यागत धावतात. विशेष म्हणजे, एक विवाहित तरुणी माहेरवाशीण बनून येथे शारीरिक सराव करीत आहे.२००६-२००७ मध्ये कुरूड, जुनी वडसा, नैनपूर आणि शिवराजपूर येथील काही जिद्दी मुलांनी स्वत:च आपल्या सवंगड्यांना सोबत घेत ध्येय ठरवले की आपण स्वस्थ न बसता देशसेवा करायला सैन्यात दाखल व्हायचे. ध्येय सुनिश्चित झाले परंतु ज्या उर्मीने, उमेदीने ही मुले एकत्र आली. त्यांच्या समोर खरी अडचण होती ती शारीरिक सरावासाठीच्या जागेची, साहित्याची आणि मार्गदर्शनाची. या चार गावात यातील काहीच उपलब्ध नव्हते. हे तरुण हार न मानणारे होते. अखेर समर्पित आणि प्रामाणिकपणे ध्येयासाठी पावले टाकल्यावर आपसूकच सारी अडथळे दूर होतात अगदी तसेच या मुलांना शोध लागला तो जेजाणी पेपरमिल जवळील पडीक मोकळ्या जागेचा. मुरमाळ जमीन असली तरी विस्तीर्ण सपाट पट्टा असल्याने मुलांनी येथे सराव सुरू केला. या सळसळत्या रक्ताच्या मुलांनी शरीराचे पाणी-पाणी करून घाम घाळला. घामाला फळ आले. आजपर्यंत आर्मीत विंकल गोडेस्वार, विक्की हुमणे, संतोष राऊत, सीआरपीएफ मध्ये आकाश ठाकरे, बीएसएफमध्ये अभय हुमणे, पोलीस खात्यात देवराव केळझळकर, नरेश उरकुडे (पीएसआय), नितेश झूरे, प्रशांत नाकतोडे, राकेश गणवीर, छंदक रामटेके, अरूण मेश्राम, अनिल ढोरे, लता भूरले, नंदू झूरे आणि शहीद झालेल्या दुर्योधन नाकतोडे यांचा समावेश होता.सद्यस्थितीत शंभर मीटर, चारशे मीटर, बाराशे मीटर अंतराची धावपट्टी, लांब उडी खड्डा, पुश अप खांब तयार केलेले आहेत. याकरिता वीस-पंचवीस मुला-मुलींनी वर्गणी काढून साहित्याची जुळवाजुळव केली. मुलांसमोर अनेकानेक अडचणी असून गावात व्यायामशाळा, वाचनालय निर्माण करण्याची मागणी सदर ध्येयासक्त तरुणांनी केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी