लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोली उपविभागीय पथक व चामोर्शी पोलिसांनी जामगिरी मार्गावर पाळत ठेवून क्रिष्णनगर वळणावर चारचाकी वाहन अडवून या वाहनातील ५ लाख ५७ हजार ४०० रुपयांची विदेशी दारू जप्त केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.पिंटू उर्फ प्रशांत मंडल रा. गडचिरोली हा आपल्या दोन साथीदारांसह चारचाकी वाहनाने विदेशी दारूची वाहतूक करून चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दितील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करणार असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गडचिरोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पथक व चामोर्शी पोलिसांनी जामगिरी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान एमएच ३१ एजी ८०४४ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन संशयास्पद स्थितीत येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली. सदर वाहनातील इसमाने पळ काढून वाहन तिथेच ठेवला. पोलिसांनी या वाहनातून विदेशी दारूच्या ३९ पेट्या जप्त केल्या. दारू व वाहन मिळून पोलिसांनी एकूण ९ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पावणे सहा लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:17 IST
मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोली उपविभागीय पथक व चामोर्शी पोलिसांनी जामगिरी मार्गावर पाळत ठेवून क्रिष्णनगर वळणावर चारचाकी वाहन अडवून या वाहनातील ५ लाख ५७ हजार ४०० रुपयांची विदेशी दारू जप्त केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
पावणे सहा लाखांची दारू जप्त
ठळक मुद्देचारचाकी वाहन ताब्यात : एसडीपीओ पथक व चामोर्शी पोलिसांची संयुक्त कारवाई