शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सुरक्षा जवानांनी केला १२ नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये उडाली चकमक, मोठा शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 08:02 IST

सायंकाळी गाेळीबार थांबला. घटनास्थळावरून १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

विजापूर/गडचिराेली : छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ही माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे. त्यातच माओवाद्यांचा टीसीओसी कालावधी सुरू आहे. गंगालूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिदिया गावाजवळच्या जंगलामध्ये विजापूर, बस्तर व सुकमा या तीन जिल्ह्यांच्या जवानांनी संयुक्तपणे घेरून माओवाद्यांचा खात्मा केला. माओवादी चळवळीला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

सायंकाळी गाेळीबार थांबला. घटनास्थळावरून १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

नक्षलवादी चैतू याला पकडण्यासाठी शोधमोहीमपिडियाच्या जंगलात सुरक्षा दलांनी ज्याला घेरण्यासाठी हालचाली केल्या तो नक्षलवादी चैतू हा दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीचा सदस्य आहे. त्याला पकडण्यासाठी ४० लाख रुपयांहून अधिक रकमेचे बक्षीस सरकारने जाहीर केले होेते. बस्तरमध्ये चालणाऱ्या नक्षलवादी कारवायांचा तो सूत्रधार आहे. 

या वर्षी आतापर्यंत १०३ नक्षलवाद्यांचा खात्मायंदाच्या वर्षी छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत १०३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अबूझमाड जंगलात ३० एप्रिल २०२४ रोजी छत्तीसगडमधील सुरक्षा जवान व माओवाद्यांत चकमक झाली होती. यात दहा नक्षल्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते. नक्षलवाद्यांचा कमांडर लिंगा, पापाराव, चैतू आदींचा पीडिया परिसरात वावर आहे अशी माहिती मिळाली हाेती. त्यानंतर दंतेवाडा, विजापूर, सुकमा या तीनही जिल्ह्यांतील सुरक्षा दलांच्या जवानांनी संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२०० जवानांनी मोहीम फत्ते केली. काही नक्षली जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकताे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी