शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

संसर्ग व श्वसनाच्या आजारग्रस्तांची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी आपले आजार किंवा कोणतीही लक्षणे असल्यास ती लपवू नये. आशा सेविकांना सर्व माहिती सांगावी.

ठळक मुद्देकोरोनाला रोखण्याचा प्रयत्न : सर्व्हेक्षणकर्त्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असताना या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांसह श्वसनाचा आजार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. गावपातळीवर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाबाधितांचा शोध घेऊन तातडीने उपचार करणे, तसेच इतर संसर्गजन्य आजार, मलेरिया आणि श्वसनाच्या आजाराचे रु ग्ण शोधून त्यांना त्वरित संदर्भ सेवा देणे यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी आपले आजार किंवा कोणतीही लक्षणे असल्यास ती लपवू नये. आशा सेविकांना सर्व माहिती सांगावी. कारण जर असे आजार किंवा लक्षणे लपविली तर भविष्यात साथरोग मोठया प्रमाणात फैलावू शकतो. आरोग्य यंत्रणेला दिलेली सर्व माहिती गोपनिय ठेवण्यात येईल, असे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी या सर्व्हेक्षणाला सुरूवात करताना सांगितले.सर्व्हेक्षणकर्त्यांना कोणत्याही कुटुंबात संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळल्यास, मलेरियासाठी रक्त नमुना, टी.बी.साठी थुंकी नमुना जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन द्यावा लागणार आहे. लहान मुलांमध्ये सर्दी व खोकला, ताप, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, श्वसनाचा दर वाढणे, खाणे-पिणे सोडून देणे, झटके येणे, मुल सुस्त होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. आशा, आरोग्य सेविकांच्या गृहभेटीत या सर्वांची माहिती घेतली जाणार आहे. महिला-किशोरवयीन मुली यांची तपासणी करताना मासिक पाळी रजिस्टर, मासिक पाळी स्वास्थ्य, सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता याबाबत आढावा घेणार आहेत. गरोदर मातांच्या आरोग्य स्थितीची पडताळणी केली जाईल.आरोग्य कर्मचाऱ्यांना हवी या प्रश्नांची उत्तरेसर्वेक्षणादरम्यान आरोग्य यंत्रणेकडून घरोघरी जाऊन माहिती जाणून घेतली जाणार आहे. त्यात घरातील कोणाला ताप आहे का? खोकला आहे का? श्वास घेण्यास त्रास आहे का? दम, धाप लागते आहे का? घरात ६० वर्षावरील व्यक्ती आहे का? उच्च रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग किंवा इतर दुर्धर आजार आहे का? असे प्रश्न विचारतील. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही नवीन तसेच जुन्या आजारांबाबतची योग्य ती माहिती देणे आवश्यक आहे. यातून जिल्ह्याची आरोग्यविषयक तपशीलवार माहिती एकत्र होण्यास मदत मिळणार आहे. यातूनच कमी व जास्त जोखमीच्या लोकसंख्येचे प्रमाण आणि आकडेवारीही समोर येणार आहे.हे आजारग्रस्त नागरिक ठरणार जोखमीचेतीव्र जोखमीच्या लोकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) रु ग्ण, गर्भवती व स्तनदा माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि इतर दीर्घ आजार असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. ६० वर्षावरील अशा सर्व व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी शक्यतो घराबाहेर निघू नये. आवश्यकता असल्यास योग्य काळजी घेऊन बाहेर पडावे. सर्दी, खोकला व शरीराचे तापमान १००.४ फॅरेनाइट किंवा ३८ अंश सेल्सियस व त्यापेक्षा अधिक असल्यास, दम, धाप जास्त प्रमाणात लागणे, श्वसन दर वाढल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक