शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा तीन दिवस शाळा-काॅलेज आणि दुकानेही राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 05:00 IST

अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने दि.११ ते १३ जुलैदरम्यान शाळा-आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता १६ जुलैपर्यंत तो आदेश कायम राहणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी तीन दिवस अतिमहत्त्वाचे काम नसताना बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या १० जुलैपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांसह छोटे नाल्यांना पूर येऊन अनेक मार्ग बंद झाले आहेत. आता जलप्रकल्पांमधून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती आणखीच बिकट होत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी अत्यावश्यक सेवा वगळता शाळा-महाविद्यालयांसह खासगी आस्थापना बंद ठेवण्याच्या आदेशाला पुन्हा शनिवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने दि.११ ते १३ जुलैदरम्यान शाळा-आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता १६ जुलैपर्यंत तो आदेश कायम राहणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी तीन दिवस अतिमहत्त्वाचे काम नसताना बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. 

वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा-    गेल्या काही दिवसांत विदर्भातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. वर्धा तसेच  चंद्रपूर जिल्ह्यातील पाणीही वर्धा नदीमार्फत चपराळा येथून वैनगंगेला मिळते. आता गोसीखुर्द धरणातून जास्त पाणी सोडण्यात येत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत वडसा, आरमोरी आणि गडचिरोली येथील वैनगंगा नदीपात्रात व जवळील नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील वडसा, आरमोरी व गडचिरोलीतील गावांना सर्तकतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी, नाले ओलांडण्याचे टाळावे.  पाणी पुलावरून वाहात असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गरोदर महिलांना सुखरूप हलविले-    सिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीच्या पुरामुळे अनेक भागात स्थिती गंभीर होत आहे. तसेच मेडीगड्डा बॅरेजच्या विसर्गामुळे गोदावरी नदीचे पाणीही काही गावांमध्ये शिरले आहे. अशा पूरग्रस्त भागातून बचाव पथकाने बुधवारी दोन गरोदर महिलांना बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. दरम्यान आतापर्यंत १७७ कुटुंबांतील २१०३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर