शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा, दुकाने बाहेरून बंद, आतून सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत असल्याने जवळपास तेवढाच वेळ दुकान सुरू ठेवण्यास दुकानदारांना वेळ मिळतो, तसेच ग्राहकांनाही ४ वाजतानंतर दुकाने बंद हाेत असल्याची माहिती असल्याने बहुतांशी ग्राहक ४ वाजतापूर्वीच साहित्य खरेदी करतात. एखादाच ग्राहक ४ वाजतानंतर साहित्य खरेदीसाठी येतो. या ग्राहकाला साहित्य देण्यासाठी नियम ताेडून दुकाने उघडी ठेवली जात आहेत. 

ठळक मुद्देगडचिराेली शहरातील स्थिती : एकाला बघून दुसरा माेडत आहे नियम

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही दुकाने ४ वाजतानंतरही सुरू ठेवली जातात. बाहेरून शटर टाकून ठेवले जाते. आतमध्ये मात्र ग्राहक राहत असून ग्राहकांना सामान दिले जाते. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी हाेऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी दुकाने सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहत हाेती.आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत असल्याने जवळपास तेवढाच वेळ दुकान सुरू ठेवण्यास दुकानदारांना वेळ मिळतो, तसेच ग्राहकांनाही ४ वाजतानंतर दुकाने बंद हाेत असल्याची माहिती असल्याने बहुतांशी ग्राहक ४ वाजतापूर्वीच साहित्य खरेदी करतात. एखादाच ग्राहक ४ वाजतानंतर साहित्य खरेदीसाठी येतो. या ग्राहकाला साहित्य देण्यासाठी नियम ताेडून दुकाने उघडी ठेवली जात आहेत. 

कारवाई हाेत नसल्याने नियम ताेडण्याचे प्रकार वाढलेनिर्बंध माेडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. सुरुवातीला नगर परिषदेचे पथक फिरून सुरू राहत असलेल्या दुकानांवर कारवाई करीत हाेते. आता मात्र पथकामार्फत कारवाई केली जात नसल्याने दुकानदारांची हिंमत वाढली आहे. एकाला बघून दुसरा दुकानदार सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवत आहेत. ५ वाजेपर्यंत तर सर्वच दुकाने नियम ताेडून सुरू राहतात. 

रात्री ११ वाजेपर्यंत हाॅटेलमध्ये ग्राहकांची रेलचेलसकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसवून सेवा देण्याची मुभा हाॅटेल मालकांना देण्यात आली आहे. ४ वाजतानंतर केवळ पार्सलसेवा द्यायची आहे. मात्र, शहरातील हाॅटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतात. हाॅटेलमध्येच जेवणाची व्यवस्था केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांचे नियम हाॅटेल मालकांकडून पूर्णपणे धाब्यावर बसविले जात आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. 

दुकानाबाहेर राहताे कामगारलाेकमत प्रतिनिधीला मुख्य मार्केटमधील एक कापड दुकान अर्धवट शटर टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. बाहेर असलेल्या कामगाराला दुकान सुरू आहे काय? आपल्याला कपडे घ्यायचे आहेत असे विचारले असता, कामगाराने दुकान सुरू असल्याचे सांगितले. शटर उघडून दुकानात प्रवेश करून काही ग्राहक दुकानामध्ये कपडे खरेदी करीत असल्याचे दिसून आले.

हाॅटेलमध्ये दिवसभर शुकशुकाटगडचिराेली शहरातील हाॅटेलचा व्यवसाय रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत याच काळात हाेते. दिवसा फार कमी ग्राहक हाॅटेलमध्ये जातात. केवळ रात्रीच्या व्यवसायाच्या भरवशावर सर्व मदार अवलंबून आहे. त्यामुळे रात्री हाॅटेल सुरू ठेवताना काेराेनाचे नियम हाॅटेल व्यावसायिकांनी पाळणे अपेक्षित आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार