शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ मिळवूण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:40 IST

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, जीवनोन्नती अभियानाच्या चेतना लाटकर उपस्थित होत्या. ...

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, जीवनोन्नती अभियानाच्या चेतना लाटकर उपस्थित होत्या.

महिला बचत गटाद्वारे तयार केलेल्या उत्पादनाला नागपूर येथील नामांकित कंपनीसोबत जोडून पदार्थांचे विक्री केंद्र सुरू करता येईल का, याबाबतही माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना यावेळी केल्या.

(बॉक्स)

महिलांच्या हिमतीने भारावल्या आयुक्त

महिनाभरात दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्ह्याच्या भेटीवर आलेल्या विभागीय आयुक्तांनी रामगड संगिनी ग्रामसंघाद्वारे चालविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. पदार्थ निर्मिती, पॅकेजिंग, विक्री व फायदे तोटे समजून घेतले. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील महिला अतिशय चांगल्या प्रकारे काम करून कुटुंबाला आर्थिक पाठबळ देत आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या राहून त्यांनी सर्वांसमोर एक प्रकारचा आदर्शच निर्माण केला आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

(बॉक्स)

विविध पदार्थांचा घेतला आस्वाद

यावेळी आयुक्तांनी महिला बचत गटाद्वारे तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही घेतला. बचत गटाने जांभूळ पल्प, सीताफळ, अंबाडी, मोहाचे लाडू, मध, आदी विविध पदार्थ व फळ प्रकियेची माहिती दिली. बचत गटाच्या सीताफळ व जांभूळ प्रकल्पाचे त्यांनी विशेष कौतुक करून भविष्यात इतर ठिकाणीही महिला बचत गटाद्वारे असे विविध उपक्रम पाहावयास मिळतील, अशी आशा व्यक्त केली.

(बाक्स)

गोगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट

आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी गोगाव येथील फुलोरा क्षमता विकसन बालभवन प्रकल्प असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह स्थानिक साहित्यामधून मुलांना शिक्षण दिले जाते, त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत नव्हते. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले विविध उपक्रम त्यांनी आयुक्तांना सादर केले. मुलांसाठी हसतखेळत मनोरंजनातून वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून चांगले शिक्षण देण्याचे कार्य या शाळेतून होत असल्याची कौतुकापर भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनीत मत्ते, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हेमलता परसा उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून फुलोरा क्षमता विकसित प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाची पार्श्वभूमी, सादरीकरण, साहित्य निर्मिती व इतर माहिती भेटीदरम्यान देण्यात आली. शाळेतील व्हर्च्युयल क्लासरूमलासुद्धा मान्यवरांनी भेट दिली. शाळेतील शिक्षिका सुरेखा हलामी, शालू मेटे व वनश्री जाधव यांनी यावेळी सादरीकरण केले. याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी यु. एन. राऊत, केंद्रप्रमुख बंडू खोबरागडे, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला खोबरागडे, शिक्षक वृंद, विषय सहायक डॉ. विजय रामटेके, कुणाल कोवे व विठ्ठल होंडे उपस्थित होते. तांत्रिक सहकार्य विषय सहायक तपण सरकार यांनी केले.