गडचिराेली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका दाेन टप्प्यात पार पडल्या आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून सरपंच पदाची निवड करावयाची आहे. त्याअनुषंगाने बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची साेडत एकाच दिवशी ४ फेब्रुवारी राेजी गुरूवारी तालुकास्थळी काढण्यात येणार आहे.
यासंदर्भात सर्व तहसील कार्यालयाच्या वतीने जाहीर सूचना निर्गमित करण्यात आली आहे. उपराेक्त आरक्षण साेडत सभेला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदारांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सरपंच पदाची आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे. याबाबतची सूचना गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, धानाेरा आदी ठिकाणच्या तहसीलदारांसह इतर सर्व तहसीलदारांनी काढली आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे निवडणुकीपासूनच लक्ष लागले आहे.