शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रेती उपशाने पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

सोडे नदीची रेती अतिशय चांगली आहे. त्यामुळे या रेतीची विशेष मागणी असल्याने रेती तस्कर याच नदीतून रेतीची चोरी करीत आहेत. रेती चोरलेल्या पात्राची पाहणी केल्यस पाचशेपेक्षा अधिक ब्रॉस रेतीची चोरी झाली आहे, असे दिसून येईल. एवढेच नाही तर अगदी पुलाच्या पिलरपर्यंत खड्डा पाडला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : सोडे नदीतून हजारो ब्रॉस रेतीची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या धानोरा-रांगी मार्गावरील सोडे नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे, रेती तस्करांनी पुलाच्या पिलरपर्यंत जवळपास चार फूट खोलपर्यंत रेती उपसली आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झालाा आहे. महसूल विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाळू उपसा धोरणानुसार ३० सप्टेंबर रोजी मागील वर्षीच्या लिलावाची मुदत संपली. अजूनपर्यंत रेती घाटांचे नवीन लिलाव झाले नाही. पावसाळा संपल्यानंतर घर, पूल, रस्ते व इतर शासकीय इमारतींच्या बांधकामांना वेग आला आहे. त्यामुळे रेतीची मागणी वाढली असताना रेतीची वाहतूक करण्यावर बंदी आहे. घराचे काम ठप्प राहू नये, यासाठी पाहिजे तेवढी किंमत मोजायला घर मालक व कंत्राटदार तयार आहेत. याचा फायदा रेती तस्करांनी उचलण्यास सुरूवात केली आहे. रात्रीच्या सुमारास तर कधीकधी भरदिवसा सुध्दा रेती तस्करी केली जात आहे. जवळपास तीन ते चार हजार रुपये प्रती ट्रॅक्टर दराने रेती विकली जात असल्याने पैशाची लालच रेती तस्करांनी लागली आहे. रेती तस्करी करताना ट्रॅक्टर आढळून आल्यास १ लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. यालाही न मानता रेती तस्कर रेतीची वाहतूक करीत आहेत.सोडे नदीची रेती अतिशय चांगली आहे. त्यामुळे या रेतीची विशेष मागणी असल्याने रेती तस्कर याच नदीतून रेतीची चोरी करीत आहेत. रेती चोरलेल्या पात्राची पाहणी केल्यस पाचशेपेक्षा अधिक ब्रॉस रेतीची चोरी झाली आहे, असे दिसून येईल. एवढेच नाही तर अगदी पुलाच्या पिलरपर्यंत खड्डा पाडला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेती निघून गेल्यास पुलाचा पिलर कोसळण्याचा धोका असल्याने नदी घाटाचा लिलाव करताना पुलाजवळ रेती उपसू दिली जात नाही. रेती चोरट्यांनी मात्र पिलरपर्यंत रेतीचा उपसा केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.गडचिरोलीतील रेतीची तस्करी वाढलीगडचिरोली : गडचिरोली शहरात बांधकामांना वेग आला आहे. मात्र रेतीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. बांधकाम ठप्प पडू नये, यासाठी घर मालक अधिकची किंमत देण्यास तयार असल्याने रात्रीच्या सुमारास जवळपासच्या नदी पात्रामधून रेती चोरून आणत आहेत. रात्री महसूल कर्मचारी पाळत ठेवू शकत नाही. ही बाब रेती तस्करांना माहित असल्याने रात्रीच्या सुमारास रेती चोरली जात आहे. रेतीची तस्करी होऊ नये, यासाठी महसूल विभाग प्रयत्न करीत असला तरी त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे.वर्दळीचा मार्गधानोरा-रांगी हा अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गाने तलाठी, मंडळ अधिकारी व इतर कर्मचारी नेहमीच प्रवास करतात. असे असतानाही शेकडो ब्रॉस रेती चोरली असताना या अधिकाऱ्यांच्या आजपर्यंत कसे काय लक्षात आले नाही. महसूल विभागाच्या अधिकाºयांना काही टक्का हिस्सा आम्ही देतो. त्यामुळे ते आमच्यावर कोणतीच कारवाई करू शकत नाही, असे रेती तस्कर खुलेआम सांगत आहेत. विशेष म्हणजे, अगदी वर्दळीच्या मार्गावरून रेती चोरी होत असतानाही कारवाई होत नसल्याने रेती तस्करांच्या बोलण्यात सत्यता असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, सोडे नदी पात्राचा कधीच लिलाव होत नाही. त्यामुळे जेवढा खड्डा पाडल्या गेला आहे, तेवढ्या खड्ड्यातील संपूर्ण रेती चोरून नेण्यात आली आहे. यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागला आहे.

टॅग्स :sandवाळू