शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सती नदीपात्रातून रेती उपसा जाेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

सती नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा करून  अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात असताना संबंधित विभागाद्वारे कोणतीच कारवाई होत नसल्याने या रेती तस्करांना महसूल विभाग व वनविभागाची मूक संमती नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासकीय कामावरही या अवैध रेतीचा पुरवठा होत असताना याची साधी चौकशी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे होत असलेल्या रेती तस्करी स्थानिक महसूल प्रशासनाची सहमती असल्याच्या चर्चेला उधाण येऊ लागले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा, कुंभीटोला, चिचटोला या सती नदी घाटातून रात्री-बेरात्री अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून रेती पुरवठ्याच्या गोरख धंद्याला उधाण आले आहे. राजरोस रेतीची तस्करी होताना स्थानिक महसूल विभाग, वनविभाग मात्र चूप आहे. शासनाच्या लाखो रुपये महसुलावर पाणी फेरल्या जात आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासकीय निमशासकीय बांधकामे सुरू आहेत. बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या नदीपात्रातील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने अद्यापही रेती घाटाचे लिलाव करण्यात आले नाही. त्यामुळे रेती टंचाईचा फायदा घेत कुरखेडा येथील रेती तस्करांची ‘ गँग ‘ रात्रीच्या किर्रर्र  अंधारात कुरखेडा लगतच्या सती नदीच्या कुंभीटोला, चिचटोला घाटामधून रेतीचा उपसा करीत आहे. सती नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा करून  अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात असताना संबंधित विभागाद्वारे कोणतीच कारवाई होत नसल्याने या रेती तस्करांना महसूल विभाग व वनविभागाची मूक संमती नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासकीय कामावरही या अवैध रेतीचा पुरवठा होत असताना याची साधी चौकशी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे होत असलेल्या रेती तस्करी स्थानिक महसूल प्रशासनाची सहमती असल्याच्या चर्चेला उधाण येऊ लागले आहे. त्यामुळे यात दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. अलिकडे घर बांधकामाचे प्रमाण वाढले आहेत. रेती घाटाचे लिलाव न झाल्याने चाेरीच्या रेतीवर भिस्त आहे. 

पाच ब्राॅस रेती गेली कुठे?-    एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेतीचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम चढत्या रेती दरामुळे थांबले आहे. महसूल विभागाच्या संगनमताने. रेती तस्करांची मुजोरी वाढली आहे. त्यांना कुणाचाच धाक नसल्याचे जाणवत आहे.

 

टॅग्स :sandवाळूriverनदी