शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

रेतीघाटातून महसूल मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:19 IST

दुसऱ्या फेरीतील रेतीघाट लिलाव प्रक्रियेसाठी कार्यवाही जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीतील २३ रेतीघाटांसाठी मागविण्यात आलेली ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने ३१ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे. यातून प्रशासन व शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रक्रिया सुरू : ३१ ला उघडणार २३ घाटाच्या निविदा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसऱ्या फेरीतील रेतीघाट लिलाव प्रक्रियेसाठी कार्यवाही जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीतील २३ रेतीघाटांसाठी मागविण्यात आलेली ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने ३१ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे. यातून प्रशासन व शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात नदी, नाल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेतीघाटांची संख्याही बºयापैकी आहे. मध्यंतरीच्या काळात रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया लांबल्याने जिल्ह्यात रेतीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने गतीने कार्यवाही करून लिलावाची पहिली फेरी पार पाडण्यात आली. या फेरीत ३१ रेतीघाट ठेवण्यात आले होते. यापैकी २६ रेती घाटांचा लिलाव झाला. आता रेतीघाट लिलावाची दुसरी फेरी आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या फेरीत २३ रेतीघाट ठेवण्यात आले आहे. सदर रेतीघाटातून रेतीचे खनन व वाहतुकीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे.तीन हजार ब्रासपर्यंतच्या घाटासाठी तीन महिने किंवा ३० सप्टेंबर यापैकी जे कमी असेल तो कालावधी रेती खननासाठी राहणार आहे. ३००१ ते ४५०० ब्रासपर्यंतच्या घाटासाठी साडेचार महिने किंवा ३० सप्टेंबर २०१९ यापैकी जे कमी असेल त्या कालावधीत खनन करता येणार आहे. ४५०१ ते ६००० ब्रासपर्यंतच्या घाटासाठी सहा महिने किंवा ३० सप्टेंबर २०१९ तसेच ६००१ ब्रास व त्यावरील घाटासाठी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत संबंधित कंत्राटदारांना रेतीचे खनन करून वाहतूक करता येणार आहे.दुसºया फेरीतील रेतीघाटाच्या लिलाव प्रक्रियेसाठी १७ जुलैपासून संबंधित कंत्राटदाराकडून रजिस्ट्रेशन स्वीकारण्यास सुरूवात झाली. याच तारखेपासून ई-निविदा आॅनलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येत आहे. २४ जुलैला निविदाधारकांस आॅनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया बंद झाली. २९ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर रेतीघाटासाठी ई-निविदा प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ३१ जुलै रोजी ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने उघडण्यात येणार आहे. सदर रेतीघाटाच्या लिलावातून प्रशासन व शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूूल खनिकर्म विभागामार्फत मिळणार आहे.हे आहेत लिलावातील रेतीघाटदुसºया फेरीतील लिलावासाठी २३ रेतीघाट ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील चिचगुंडी, महागाव, आरमोरी तालुक्यातील वनखी, रामपूर चक, कुरखेडा तालुक्यातील नान्ही, मौशी, गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी, गायघाट, विहिरगाव चक, चांदाळा, शिवनी, देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर, अरततोंडी, कोकडी १, कोकडी २, धानोरा तालुक्यातील चिचोली, मिचगाव बुज, जांभळी, बांधोना, मुलचेरा तालुक्यातील गोमणी, मच्छीगट्टा व सिरोंचा तालुक्यातील आरडा माल, अंकिसा माल व मद्दीकुंठा आदींचा समावेश आहे. या सर्व रेतीघाटांची मिळून एकूण अंतिम अप्सेट किंमत चार कोटी तीन लाख रुपये आहे.

टॅग्स :sandवाळू