दोन वनतस्कर आरोपींना अटक : वन विभागाच्या फिरत्या पथकाची कारवाईअहेरी : प्राणहिता नदीच्या महागाव घाटावरून सागवान पाट्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे वन विभागाच्या आलापल्ली येथील फिरत्या पथकांनी सापळा रचून १९ हजार ७५३ रूपये किमतीच्या सागवान पाट्या जप्त केल्याची कारवाई शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी दोन वनतस्करांना अटक केली आहे. सिताराम बोदालू मडावी (३५), दुर्गा बक्का मडावी (४५) रा. महागाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. अहेरी तालुक्यातील महागाव बु. गावानजीकच्या प्राणहिता नदी घाटावरून सागवानची तस्करी होत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून वनाधिकाऱ्यांनी प्राणहिता नदी घाटावरून ०.४८८ घनमीटरचे १९ हजार ७५३ रूपये किमतीच्या सागवान पाट्या जप्त केल्या. सदर कारवाई वनाधिकारी जी. एन. तवगर, क्षेत्र सहायक आर. एल. सागळे, वनरक्षक पी. एस. घुटे आदींनी केली.
प्राणहिता नदीघाटावर सागवान जप्त
By admin | Updated: June 1, 2015 01:57 IST