शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ग्रामीण भागात मागेल त्याला मिळणार इंटरनेट जाेडणी -जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 5:00 AM

भारत नेट प्रकल्पांतर्गत मागील दाेन वर्षांपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामपातळीपर्यंत इंटरनेटचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सध्या पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे.

ठळक मुद्देठाणेगाव भारत नेट प्रकल्पाच्या पाहणीनंतर दिली ग्वाही

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या सहा तालुक्यांतील गावांमध्ये इंटरनेट केबल पाेहाेचली आहे. त्या गावातील गरजू लाेकांना इंटरनेटची जाेडणी माफक दरात उपलब्ध हाेईल. तसेच गावातील मुख्य ठिकाणी वायफाय सेवा माेफत दरात उपलब्ध हाेईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. भारत नेट प्रकल्पांतर्गत मागील दाेन वर्षांपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामपातळीपर्यंत इंटरनेटचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सध्या पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. पहिल्या टप्प्यात कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतपर्यंतची मुख्य जोडणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. आता ग्रामपंचायतीमधून गावातील प्रत्येकी पाच शासकीय कार्यालयांना इंटरनेट जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. या जोडणीमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जोडणीला प्राधान्य देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांकडून सीएससीला देण्यात आले होते.  त्याअंतर्गत झालेल्या कामाचे अवलोकन करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे भेट दिली, तसेच आरमोरी तालुक्यात इंटरनेट जोडणीकरिता सीएससी वाय-फाय चौपाल कार्यक्रमांतर्गत सीएससी केंद्र संचालक पराग हजारे यांच्या केंद्रात प्रस्थापित केलेल्या मिनी ओईलटीचीसुद्धा पाहणी केली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कार्यप्रगतीवर समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प  योग्यरित्या राबवून जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सीएससी जिल्हा समन्वयक शाहीद शेख यांनी दिली. याप्रसंगी  देसाईगंज उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, आरमोरी तहसीलदार कल्याण कुमार दहाट, संवर्ग विकास अधिकारी चेतन शिवांश, महा आयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयंत मुकुंदवार, बीएनएलचे नेटवर्क इंजिनिअर समीर शेख, जिल्हा व्हीएलई सोसायटीचे अध्यक्ष नसिर हाशमी प्रामुख्याने उपस्थित होते.

इतरही तालुक्यांमध्ये भारत नेट कार्यक्रमाला गती देण्याचे निर्देशसहा तालुके वगळता इतरही तालुक्यांमधील गावे इंटरनेटने जाेडण्याचे काम सुरू आहे. हा कार्यक्रम युद्धस्तरावर राबवून जोडणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जोडणीद्वारे गावातील इतर गरजू लोकांनासुद्धा माफक दरात ही जोडणी उपलब्ध करून इंटरनेटची जिल्ह्यातील एक पोकळी कमी करण्याचीसुद्धा सूचना केली. यातून जिह्यातील इंटरनेट समस्या निश्चितच सुटेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. एक गावात एका ठिकाणाहून नागरिकांसाठी नाममात्र दरात वाय-फाय पुरवठा केला जाणार आहे. यातून स्थानिक नागरिकांना चांगल्याप्रकारे फायदा होऊन त्यांची कामे मार्गी लावता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

 

टॅग्स :Internetइंटरनेटcollectorजिल्हाधिकारी