लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खर्रा खाऊन और गणवेश न घालता बस चालविणे एसटी महामंडळांच्या व खासगी प्रवासी गाडीच्या चालकांना महागात पडले. स्थानिक आरमोरी रोड बस थांब्यावर परिवहन अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत गुरूवारी चार बसेसवर नियमभंगप्रकरणी कारवाई करण्यात आली. यात दोन एसटी महामंडळाच्या तर दोन खासगी बसेसचा समावेश आहे.शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि रस्त्यांवर होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी परिवहन अधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे. आरमोरी बस स्थानकावर अवैधपणे कोणत्याही बसेस थांबणार नाही अशा सूचना करण्यात आल्या. मात्र तरीही काही खासगी गाड्यांसह एसटी महामंडळाच्या बसेस तिथे उभ्या केल्या जात होत्या. दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, निरीक्षक अहीर यांनी गुरूवारी गस्त घालून आरमोरी रोड थांब्यावर तपासणी केली. यावेळी एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक गणवेशात नव्हते. याशिवाय दोन खासगी बसचे चालक खर्रा खाऊन गाडी चालवत असल्याचे आढळले.
खर्रेबाज चालकांना आरटीओचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:33 IST
खर्रा खाऊन और गणवेश न घालता बस चालविणे एसटी महामंडळांच्या व खासगी प्रवासी गाडीच्या चालकांना महागात पडले.
खर्रेबाज चालकांना आरटीओचा दणका
ठळक मुद्देखर्रा खाऊन और गणवेश न घालता बस चालविणे एसटी महामंडळांच्या व खासगी प्रवासी गाडीच्या चालकांना महागात पडले.