शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

कंदीलाच्या उजेडात चालायच्या धानपिकाच्या रोवण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

जोरदार पाऊस बरसला तरच रोवणीच्या हंगामाला उधाण येत असे. त्यात रोवणी आणि महिला यांचे अतूट असे नाते, एवढे कि महिलांशिवाय रोवणीची कल्पना पण होऊ शकत नाही. परंतु आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आतासारखी रोवणीची गुत्ता (हुंडा) पद्धत नव्हती. त्यामुळे येथील महिला पारोग (प्रहर) पद्धती आणि दिवसाच्या रोजीने (वणीने) धानपीक रोवणी करीत असत.

ठळक मुद्देतीन दशकांपूर्वीपर्यंत पारोग पद्धतीने रोवणी : रोवणी यंत्र आले पण महिलांची दादागिरी कायम

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : काळानुरूप शेतीचे यांत्रिकीकरण होऊन शेतीची कामे दिवसेंदिवस सोपी होत आहेत. मात्र आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत महिला धानपीकाच्या शेतात रोवणी करताना दिवसाच्या रोजीसह पारोग (प्रहर) पद्धतीने काम चालत असे. महिला सकाळी सूर्योदयापूर्वी आणि सायंकाळी सूर्यास्तानंतरही शेतात असायच्या. परिणामी अंधार पडताच कंदीलाच्या उजेडात धान पीकाची रोवणी केली जात असे.फार पूर्वीपासून धानाच्या शेतातील रोवणीची कामे महिलाच करतात. धान पेरणी झाल्यावर २१ दिवसानंतर रोवणी सुरू होत असे. मात्र जोरदार पाऊस बरसला तरच रोवणीच्या हंगामाला उधाण येत असे. त्यात रोवणी आणि महिला यांचे अतूट असे नाते, एवढे कि महिलांशिवाय रोवणीची कल्पना पण होऊ शकत नाही. परंतु आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आतासारखी रोवणीची गुत्ता (हुंडा) पद्धत नव्हती. त्यामुळे येथील महिला पारोग (प्रहर) पद्धती आणि दिवसाच्या रोजीने (वणीने) धानपीक रोवणी करीत असत.पारोग म्हणजे दोन-तीन तासांचा अवधी. ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतात रोवणी सुरू करायची आहे तो शेतकरी गावातील किंरा गावाबाहेरील महिलांना भेटून कामावर येण्यास बोलणी करत असे. यादरम्यान जो अधिक पैसे देणार त्याकडे महिला कामावर जात.पारोग पद्धती असल्यामुळे स्त्रीया पहाटे तीन वाजता झोपून उठत असे. उठल्यावर घर-दार आणि अंगण झाडझूड, सडासारवण केल्यावर सकाळचे जेवण शिजवून पहाटेच्या चार-साडेचार वाजताच रोवणीला घरून निघत असे. मात्र पहाटे काळोख असल्यामुळे शेतकरी कंदिलाच्या उजेडात महिला मजुरांना शेतात सोबत घेऊन जात असे.आतासारखे शेतशिवारावर जाणारे पांदण रस्ते तेव्हा नसल्याने चिखल तुडवत पायवाटेने शेत गाठले जात होते. घरापासून शेताचे अंतर नेमके किती आहे त्यावरून महिला घरून निघत. त्यामुळे सूर्योदय होण्याआधीच महिला मजूर शेतावर पोहचत. त्यावेळी वातावरणात पुसटसा अंधार पसरला असला तरीही महिला कंदीलाच्या प्रकाशात धान रोप रोवायच्या. शेतमालक बांधित वा बांधावर कंदील पकडून उभा राहून प्रकाश दाखवत असे. मात्र आता ही पध्दत बंद झाली आहे.सकाळी ८ वाजता शेतातून घरीसकाळी सात-आठ वाजतापर्यंत दिवसातील रोवणीचा पहिला पारोग संपत असे. पारोग संपताच महिलांचा जत्था पायीच घराच्या दिशेने निघे. घरी येताच आंघोळ करून आधी कुटुंबातील सदस्यांचे कपडे धुऊन काढत, मगच जेवण करीत असे. या दरम्यान ज्या कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धती होती तिथे घरातील अन्य महिला सदस्य काम करून ठेवत असे. अन्यथा कामाचा डोंगर पार करताकरता दिवसाच्या रोजीवर जायची वेळ झाली राहायची.उजेडासाठी शेतमालक पकडायचा कंदीलसकाळी अकरा वाजेपासून दिवसाच्या रोजीला (वणीला) सुरु वात होत असल्यामुळे महिला घरून एक तासापूर्वीच निघत. ११ ते ५ वाजेपर्यंत धान रोवणी झाल्यावर परत दुसऱ्या पारोगाला आरंभ होत असे. सूर्य क्षितिजापलीकडे गेल्यावरही रोवणी सुरूच असे. परिणामी काळोख दाटू लागताच पुन्हा शेतमालक कंदील घेऊन शेतामध्ये उभा राहून प्रकाश दाखवत होता. सायंकाळी सात वाजतापर्यंत रोवणी चालू राहात असत. सरतेशेवटी रात्री आठ वाजता महिला कंदीलाच्या टिमटिमत्या प्रकाशात घरी पोहचत.चार आण्यांपासून दोन रुपयापर्यंत मजुरीयाबाबत विसोरा, शंकरपूर, कसारी येथील महिला-पुरु षांशी बातचीत केली असता एका पारोगाला चार आणे (२५ पैसे), आठ आणे (५० पैसे), बारा आणे (७५ पैसे), एक रु पया, दोन रुपये मजुरी होती असे त्यांनी सांगितले. त्या तुलनेत दिवसाची मजुरी दुप्पट मिळत होती. विसोराच्या कस्तुरबा नगर येथे राहणाऱ्या जानका नेवारे सांगतात, चार आणे ते एक रु पया रोजीने त्यांनी धान रोवणी केली आहे. कसारीच्या भिवरा मडावी म्हणाल्या, मी माझ्या जीवनात अनेक वेळा कंदीलाच्या उजेडात धान रोवणी केली आहे. आज धान रोवणी यंत्र आले, तरीपण महिलाच घरातील संपूर्ण कामे करून धानपीक रोवणीची कामे करायला जातात. यातील त्यांची मक्तेदारी अजूनही कायम आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती