शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामात आठ तालुके माघारले

By admin | Updated: January 29, 2017 01:32 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या

ग्रामपंचायती उदासीन : मजूर उपस्थिती कमी प्रमाणात गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर विविध कामे मंजूर करण्यात आली आहे. मात्र रोहयोच्या कामात धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा हे चार तालुके आघाडीवर असून येथील रोहयो कामांवर मजुरांची उपस्थिती प्रचंड आहे. मात्र इतर आठ तालुके रोहयोच्या कामात माघारले असल्याचे दिसून येते. रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या बाराही तालुक्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीमध्ये विवधि कामे घेण्यात आली आहेत. ५० टक्के कामे ग्रामपंचायतस्तरावर सुरू असून कामे सुरू असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या ५६५ आहे. या कामांवर एकूण १५ हजार १४८ इतकी मजूर उपस्थिती आहे. ५० टक्के यंत्रणास्तरावर सद्य:स्थितीत २७६ कामे सुरू असून या कामांवर ५ हजार ६८४ मजूर उपस्थिती आहे. ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून सद्य:स्थितीत ८४१ कामे सुरू असून या कामावर एकूण २० हजार ८३२ इतकी मजूर उपस्थिती आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत सद्य:स्थितीत रस्त्यांची ७४, बोडीची १७, मजगीची १३०, सिंचन विहिरींची ५३, वृक्ष लागवडीची १९, शौचालय बांधकामाची ३१, रोपवाटीकेची ५३, वन तलाव दुरूस्तीची ५८ व इतर स्वरूपाची १२१ कामे सुरू आहेत. रस्त्याच्या कामावर ६ हजार २५२, बोडीच्या कामावर २८९, मजगीच्या कामावर ६ हजार ७८८, शेततळ्याच्या कामावर ३४२, सिंचन विहिरीच्या कामावर ४८३ व इतर कामे मिळून एकूण १५ हजार १४८ मजूर उपस्थिती आहे. गडचिरोली तालुक्यात सुरू असलेल्या कामावर ३७०, मुलचेरा तालुक्यातील कामावर १ हजार १५४, देसाईगंज ७२५, अहेरी १ हजार ४१४, एटापल्ली ५७२, भामरागड ३५२, सिरोंचा तालुक्यातील रोहयो कामांवर ३२५ मजुरांची उपस्थिती आहे. रोहयोची कामे व त्यावरील मजुरांच्या उपस्थितीत सदर आठ तालुके माघारले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) गतवर्षीच्या तुलनेत कामाची मागणी कमी ४गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेती कामे न मिळाल्याने मजूर रिकाम्या हाताने कामाची प्रतीक्षा करीत होती. गतवर्षी जानेवारी महिन्यात रोहयोच्या कामाची मजुरांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती नसून रबी हंगामातील शेतीतील कामे सुरू आहेत. त्यामुळे यंदा रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरांकडून पाहिजे त्या प्रमाणात मागणी होताना दिसून येत नाही. फेब्रुवारी व मार्च महिन्यात मजुरांकडून रोहयोच्या कामाची मागणी वाढणार आहे. २०० वर ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे बंदच ४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकारची कामे मंजूर करण्यात आली आहे. मात्र सद्य:स्थितीत जिल्ह्यातील केवळ जवळपास २०० ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू आहेत. मात्र २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू नाहीत. त्यामुळे येथील मजुरांना रोजगार मिळाला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन कामे सुरू करावीत, अशी मागणी आहे.