शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उपचाराअभावी रानगव्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:24 IST

आलापल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कक्ष क्रमांक ४३ मध्ये रानगव्याचा मृत्यू झाला, असून सदर रानगव्याचा मृत्यू हा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : वन विभागाने केली निष्काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कक्ष क्रमांक ४३ मध्ये रानगव्याचा मृत्यू झाला, असून सदर रानगव्याचा मृत्यू हा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.रानगवा हा शाकाहारी वर्गातील मोठा प्राणी आहे. रानगव्यांची संख्या देशात अतिशय कमी असल्याने त्याला शेड्युल क्रमांक १ मध्ये टाकण्यात आले आहे. सुदैवाने गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर परिसरातील कोलामार्का या भागात रानगव्यांचे वास्तव्य आहे. या प्राण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन या कोलामार्का परिसराला रानगव्यांचे अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले आहे.चार ते पाच दिवसांपूर्वी एक रानगवा जखमी अवस्थेत आलापल्ली परिसरातील जंगलात लंगडत फिरत होता. याची माहिती काही वन्यप्रेमींनी आलापल्ली वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांना दिली. मात्र त्यांनी रानगव्याकडे कायमचे दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे मात्र रानगवा मिळतच नसल्याची माहिती वरिष्ठांना देत होते. त्यामुळे वरिष्ठांशी सुध्दा दिशाभूल झाली. आलापल्ली येथील वन व्यवस्थापन समिती, पेसा कोष समिती व वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून रानगव्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचाराअभावी रानगव्याचा मृत्यू झाला. रानगवा हा दूर्मिळ प्राणी आहे. तरीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. या रानगव्याला पायखूर हा संसर्गजन्य रोग झाला होता. हाच रोग इतरही प्राण्यांना होण्याची शक्यता आहे. आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांना फोन करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद होता.

टॅग्स :forest departmentवनविभाग