शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आरमोरीतील रस्ते अल्पावधीतच उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:31 IST

स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात शहराच्या विविध वॉर्डातील अनेक सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. यासाठी कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. नगर पंचायतीच्या वतीने प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर हे काम खासगी कंत्राटदारामार्फत करण्यात आले.

ठळक मुद्देकाँक्रिट रस्त्यावरील गिट्टी निघाली : अधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने झालेल्या कामाचा दर्जा सुमार

विलास चिलबुले।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात शहराच्या विविध वॉर्डातील अनेक सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. यासाठी कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. नगर पंचायतीच्या वतीने प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर हे काम खासगी कंत्राटदारामार्फत करण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदाराला नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम दर्जेदार झाले नाही. परिणामी दीड वर्षात रस्त्यावरील काँक्रिटीकरण उखडले आहे.विशेष म्हणजे रस्त्याचे काम झाल्यानंतर बºयाच ठिकाणी दीड ते दोन महिन्यातच सिमेंट काँक्रिटीकरण उखडण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड बोंब केली. त्यानंतर पालिकेच्या मुख्याधिकाºयांनी लोकांना कसेबसे उत्तर देऊन सर्व आलबेल घडवून आणले. विशेष म्हणजे आरमोरी नगर पंचायतीत निवडणूक न झाल्याने सारा कारभार एकट्या प्रशासकाच्या हाती होता. याचा गैरफायदा संबंधित प्रशासकाने पूर्णपणे उचलला. आॅनलाईन निविदा प्रक्रियेत काम मिळालेल्या संबंधित कंत्राटदाराला आपलेसे करून रस्त्याच्या कामाची पूर्णत: वाट लावून दिली. परिणामी सद्य:स्थितीत आरमोरी शहरातील ७० टक्के रस्ते पूर्णत: उखडले आहेत. कोट्यवधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात रेती, गिट्टी, सिमेंटचा पुरेशा प्रमाणात वापरण्यात आला नाही. त्यामुळे हे काम अंदाजपत्रकानुसार झाले नाही.निकृष्ट कामे झालेल्या व काँक्रिटीकरण उखडलेल्या रस्त्यांमध्ये मोरेश्वर मेश्राम यांच्या घराजवळील रस्ता, शिव मंदिरानजीकचा, आयडीआय टॉवर नजीक हेडाऊ यांच्या घरालगतचा रस्ता, केंद्र शाळेमागील, लक्ष्मी वसाहत येथील नाली बांधकाम, डोंगरी परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्ता, पं.स. नजीकचा रस्ता, बेघर टोली, कांझी हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यांचा यात समावेश आहे.दुसऱ्यांदाही काम झाले थातुरमातूरतोरनकर व डोकरे यांच्या घराजवळील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे काँक्रिटीकरण उखडल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर नगर पंचायतीने संबंधित कंत्राटदाराला रस्ता दुरूस्तीचे निर्देश दिले. कंत्राटदारांनी उखडलेल्या रस्त्याची दुरूस्ती केली. मात्र हे कामही थातुरमातूर झाले. स्थानिक नागरिकांनी हे काम योग्य होत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. मात्र त्यानंतरही प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केले. यावरून सदर दर्जाहीन कामाला प्रशासनाचे पाठबळ आहे, असे दिसून येते.शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची बातमी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर याची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला नगर पंचायतीच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली. आपण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे आपणास आढळले. संबंधित कंत्राटदाराला पुन्हा काम करण्यास सूचविले.- सतीश चौधरी, मुख्याधिकारी, नगर परिषद, आरमोरी