शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संघटना मजबूत करणे कार्यकर्त्यांची जबाबदारी

By admin | Updated: July 8, 2016 01:27 IST

कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या आधारे मार्गक्रमण करीत असते. कार्यकर्ता हाच पार्टीचा केंद्रबिंदू असल्याने कार्यकर्ता हा प्रशिक्षीत असणे आवश्यक आहे.

अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन : कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गमार्र्कंडा/चामोर्शी : कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या आधारे मार्गक्रमण करीत असते. कार्यकर्ता हाच पार्टीचा केंद्रबिंदू असल्याने कार्यकर्ता हा प्रशिक्षीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कणा असलेला कार्यकर्ता हा नेतृत्वक्षम असला पाहिजे, त्या उद्देशाने हा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. पूर्ण देशात प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वर्गाचा आयोजन केले आहे. पक्ष संघटना मजबूत झाल्यास शासन यंत्रणा विकासाच्या दिशेने आगेकुच करेल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी भारतीय परंपरा संस्कृती ही विचारधारेच्या आधारावर स्वीकार करण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते मार्र्कंडादेव येथे बोलत होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हामहामंंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे, नाना नाकाडे, प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, अनिल पोहणकर, प्रकाश अर्जुनवार, रामेश्वर सेलुकर, आनंद गण्यारपवार, सत्यनारायण मंचार्लावार, डॉ. भारत खटी, नंदू काबरा, विलास बल्लमवार, मनोज पालारपवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी ना. अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, डॉ. शामप्रसाद मुखर्जी व पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारसरणीवर आधारीत उभा झालेला पक्ष मोठा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे व सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रशिक्षण सेलचे प्रमुख प्रशांत भृगुवार, संचालन रवींद्र ओल्लालवार, तर आभार अनिल पोहणकर यांनी मानले. तीन दिवस हे प्रशिक्षण मार्र्कंडा येथे चालणार आहे. गडचिरोली, अहेरी व आरमोरी या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील २०० कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थाचे भाजपचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)