सत्कार सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डंबाजी पेंदाम, उपाध्यक्ष विलास दरडे, सचिव ओमप्रकाश सिडाम, खजिनदार सोमेश्वर दुगे, संचालक सुरेश नाईक, सुरेश मडावी, गुलाब कुमरे, भावेश उईके, कमल गावडे, सोमजी पदा, रायसिंग हरामी प्रत्यक्ष तर अन्य संचालक ऑनलाईन सहभागी झाले. सेवानिवृत्त सभासदांमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष लालाजी उसेंडी, अंताराम पदा, मेहमूद सय्यद, भाऊजी मडावी, गमतीदास मेश्राम, बाजीराव पदा, विकास नागदेवे, गंगादेवी तोडासे तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सचिन मेश्राम यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचासुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, डायरी आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. सभेत संस्थेच्या प्रगतीसाठी विकासात्मक बाबीवर चर्चा करण्यात आली. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये संस्थेच्या अनेक शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या सूचना आणि सुधारणा व्यवस्थापक मंडळासमोर मांडल्या. यशस्वीतेसाठी सदस्यांनी सहकार्य केले.
शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST