शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
2
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
3
Top Marathi News LIVE: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
4
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
6
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
8
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
9
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
10
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
11
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
12
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
13
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
14
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
15
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
16
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
18
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
19
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
20
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
Daily Top 2Weekly Top 5

आमिषाला बळी न पडता प्रतिकार करा

By admin | Updated: January 5, 2015 23:03 IST

स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या घटनांना पायबंद घालण्यासाठी महिलांना सुसंस्कृत व कार्यक्षम होणे गरजेचे आहे. काही असामाजिक तत्व अल्पवयीन मुली

आशा मिरगे यांचे आवाहन : पोलिसांतर्फे महिला सुरक्षाविषयक कार्यशाळा
गडचिरोली : स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या घटनांना पायबंद घालण्यासाठी महिलांना सुसंस्कृत व कार्यक्षम होणे गरजेचे आहे. काही असामाजिक तत्व अल्पवयीन मुली तसेच युवतींना आपल्या प्रेमपाशात ओढून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी विविध प्रलोभने ते दाखवितात. त्यामुळे अशा आमिषाला बळी न पडता त्याचा प्रतिकार प्रत्येक मुलींनी करावा, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी केले.
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जागृती सप्ताहानिमित्त स्थानिक पटेल मंगल कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक संदीप पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर अधीक्षक (प्रशासन) राजकुमार शिंदे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर उपस्थित होते.
डॉ. राहूल खाडे यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर आशा मिरगे यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. गर्भधारणेपासून पौगांडावस्थेपर्यंतच्या बदलांची माहिती आशा मिरगे यांनी यावेळी दिली. व्यक्तींमध्ये शरीरसुखाची भूक वाढल्यानेच समाजात अनाचार घडतात. विद्यार्थिनींनी अश्लील साहित्य, मालिका, चित्रपट, पोर्नसाईटस् यापासून दूर राहावे, सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी प्रवीण निंबाळकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)