शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हत्याकांडप्रकरणी मूक मोर्चातून राेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 22:50 IST

मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशाल याच्याशी जवळीक वाढली. त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचे असेल तर आशिषला कायमचे दूर करावे लागेल, असे तिने सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहरातील बहुचर्चित आंबेडकर वाॅर्डातील आशिष रवी मेश्राम या युवकाची अनैतिक संबंधातून त्याच्या पत्नीसह इतर आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी शहरात मूक मोर्चा काढून या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात मृतकाची पत्नी सपना मेश्राम हिच्यासह इतर चार आरोपींना अटक झाल्याने एकूण आरोपींची संख्या ५ वर गेली आहे.  शहराच्या आंबेडकर वाॅर्डातील आशिष मेश्राम हा ११ ऑक्टोबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घरून मोटारसायकलने निघून गेल्यानंतर भगतसिंग वाॅर्ड ते तुकुम वाॅर्ड मार्गावरील कालव्यात दि. १२ ला सकाळी त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. घटनेनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी विशाल रामभाऊ रेखडे (वय २४) या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याला बोलते केले. त्याने या प्रकरणाशी संबंधित शहराच्या कस्तुरबा वॉर्डातील निकेश पितांबर अलोणे ऊर्फ नाऱ्या (वय २२), देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील दुर्गेश देवानंद गाधाडे (२२) तसेच आंबेडकर वाॅर्डातील संतोष लेकचंद मेश्राम (२२) या तीन आरोपींना १४ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर या हत्याकांडात मृत आशिषच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली. माेर्चात शहराच्या विविध वाॅर्डातील नागरिक सहभागी झाले हाेते. 

जुने संबंध पुन्हा बहरले आणि केली हत्या-    या प्रकरणातील चार आरोपींना अटक करून बोलते केल्यानंतर हे प्रकरण अनैतिक संबंधातून घडले असल्याचे समोर येऊ लागले. दरम्यान मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशाल याच्याशी जवळीक वाढली. त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचे असेल तर आशिषला कायमचे दूर करावे लागेल, असे तिने सांगितले. त्यातूनच या हत्याकांडाचा कट शिजल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

मनमिळाऊ आणि शांत आशिषमुळे लोक रस्त्यावरदरम्यान, ही गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच शांत व मनमिळाऊ स्वभावाचा असलेल्या आशिष मेश्राम यांचा अनैतिक संबंधातून पत्नीनेच हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येऊ लागल्याने एरव्ही शांत असलेले देसाईगंज शहर पुरते  हादरले. यामुळे संतप्त शहरवासीयांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आशिषच्या हत्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत शहराच्या मुख्य मार्गांवरून मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी