देसाईगंज : आघाडी सरकारने मुसलमान समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील मुसलमान समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तथा राजकीय मागासलेपणा दूर करण्याचा प्रयत्न होता. मात्र भाजप-सेना युती सरकारने मुसलमानांच्या आरक्षणावर आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे येथील मुसलमान बांधव आपल्याला अपमानीत मानत आहेत. पाच टक्के आरक्षण हा मुस्लिम बांधवांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायलाच हवा, असा सूर मान्यवरांनी काढला.देसाईगंज येथील मदिना मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षण परिषदेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी माजी. जि. प. अध्यक्ष हाजी बशीर पटेल, अॅड. रफीकभाई, आशिक हुसैन, फिरोज खान, मुश्ताफ कुरेशी, सय्यद आबीदअली, अनवर अली, ताज कुरेशी, कादर कुरेशी, गणी शेख, हक कुरेशी, सत्तार रिझवी, शहजाद शेख उपस्थित होते.मुस्लिम बांधव जोपर्यंत अन्यायाच्या विरोधात एकवटणार नाही, तोपर्यंत या समाजावरील अन्याय दूर होणार नाही, असे प्रतिपादन पटेल यांनी केले. २ मार्च रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चा यशस्वी करण्यावरही मंथन करण्यात आले. यशस्वीतेसाठी लतीफ रिझवी, इल्यास खान, वहीद खान, अ. लतीफ शेख, सईद शेख, जावेद कुरेशी, शफीभाई, नसीम, जिब्बू यांनी सहकार्य केले. संचालन नसीर जुम्मन शेख तर आभार सईद शेख यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
आरक्षण हा मुसलमान समाजाचा हक्क
By admin | Updated: March 1, 2015 01:45 IST