शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांची बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

करपडा येथे एक ते चार वर्ग असून यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधी अक्षर ओळख सुद्धा नसून अभ्यासात पूर्णपणे माघारले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लेखन-वाचन करता येत नसून प्रत्यक्ष शाळेला भेट दिल्यास फक्त नावालाच करपडा येथील जिल्हा परिषद शाळा आहे काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी पंचायत समितीमधील सिर्सी केंद्र अंतर्गत करपडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकाची तत्काळ बदली करून नवीन शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोजबीच्या सरपंच वैशाली रामदास डोंगरवार यांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. करपडा येथे एक ते चार वर्ग असून यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधी अक्षर ओळख सुद्धा नसून अभ्यासात पूर्णपणे माघारले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लेखन-वाचन करता येत नसून प्रत्यक्ष शाळेला भेट दिल्यास फक्त नावालाच करपडा येथील जिल्हा परिषद शाळा आहे काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. वरिष्ठांची कुठल्याही प्रकारची लेखी परवानगी न घेता वारंवार सुट्ट्या मारणे, रोज शाळेत एक ते दोन तास उशिरा येणे हे नित्याचे झाल्याने काही पालकांनी ही बाब सरपंचाच्या निदर्शनास आणून दिली.  १ जानेवारी रोजी सरपंच वैशाली डोंगरवार यांनी शाळेला भेट दिली असता येथील मुख्याध्यापक मडकाम हे गैरहजर आढळून आले. याबाबत सहाय्यक शिक्षक चिलांगे यांना विचारणा केली असता, शाळेचे कागदपत्रे ऑनलाइन करण्याकरिता जवळच असलेल्या वैरागड येथे गेल्याचे सांगितले; परंतु शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील ताडाम यांनी मुख्याध्यापकाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केले असता धान भरडण्यासाठी गावाकडे गेल्याचे सांगितले. मुख्याध्यापक गैरहजर असताना  शिक्षक चिलांगे यांनी सरपंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीसुद्धा या  शिक्षकांच्या तक्रारी झाल्या असून अजूनपर्यंत त्यांच्यात सुधारणा झाली नाही. 

 

टॅग्स :sarpanchसरपंचSchoolशाळा