शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

सत्तेसाठी जातीच्या सीमारेषा पुसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:59 IST

निवडणुकीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याने एक विशिष्ट जात ही अल्पसंख्यांक ठरते. त्यामुळे एका जातीच्या भरवशावर उमेदवार कधीच निवडून येत नाही. बहुजन समाजाला सत्ता मिळवायची असेल तर जातीमधील सीमारेषा पुसून या समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देअंजली आंबेडकर यांचे प्रतिपादन : भारिप बहुजन महासंघाचा महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणुकीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याने एक विशिष्ट जात ही अल्पसंख्यांक ठरते. त्यामुळे एका जातीच्या भरवशावर उमेदवार कधीच निवडून येत नाही. बहुजन समाजाला सत्ता मिळवायची असेल तर जातीमधील सीमारेषा पुसून या समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तशी राजकीय जागृती बहुजन समाजामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले.भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात शुक्रवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. आंबेडकर उपस्थित होत्या. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या राज्य संघटिका रेखा ठाकूर, डॉ.निशा शेंडे, अरूंधती सिरसाट उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माला भजगवडी, स्वागताध्यक्ष डॉ.खुशबू दुर्गे, उपाध्यक्ष ज्योती दहिकर, उपाध्यक्ष ज्योती दहिकर, संगीता मेश्राम, डॉ.धम्मसंगिनी, शहनाज पठाण, सुरेखा बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा. आंबेडकर म्हणाल्या, बाबासाहेबांनी मोठ्या संघर्षाने बहुजन समाजाला हक्क प्राप्त करून दिले. मात्र दुसऱ्याला मतदान करून आपण स्वत:च्या हक्कांवर गदा आणत आहोत. जोपर्यंत बहुजन समाजातील सर्व जाती एकत्र येत नाही, तोपर्यंत बहुजन समाजाचा उमेदवार विजयी होणार नाही. आपला समाज स्वत:च्या अधिकारांविषयी जागृत झाला आहे. ही जागृती आदिवासींसह इतर समाजामध्येही निर्माण करणे आवश्यक आहे. येथील आदिवासींच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या, जेणेकरून आदिवासी समाजही आपल्यासोबत जोडण्यास मदत होईल. शासनाने सुमारे २९ बिलियन रूपये खर्च करून सरदार पटेल यांचा पुतळा उभारला आहे. पुतळे उभारण्यापेक्षा मनुष्यबळ विकासाची कामे होणे आवश्यक होते. आंतरराष्ट्रीयस्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकार मात्र पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवत आहे. त्यामुळे जनता हैराण आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. कार्यक्रमादरम्यान रेखा ठाकूर, डॉ.निशा शेंडे, अरूंधती सिरसाट यांनीही मार्गदर्शन केले.संचालन भाग्यश्री मेश्राम, प्रास्ताविक उज्ज्वला साखरे यांनी केले. यशस्वीतेसाठी सपना रामटेके, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा प्रवक्ता बाळू टेंभूर्णे, विधानसभा अध्यक्ष जी.के.बारसिंगे, सिद्धार्थ भैसारे, मिलींद अंबादे यांनी सहकार्य केले. मेळाव्याला जवळपास दोन हजार महिला व पुरूष उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक