शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नियमित सिंचन सुविधा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:44 IST

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जेवर वीज निर्मिती करण्यासाठी फिडरचे काम सुरू आहे. नियमितपणे विद्युत उपलब्ध करुन देण्यासाठी सोलरवर विद्युत निर्मिती करणार असून फिडर जोडण्याचे काम सुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाईन लोकसंवादादरम्यान म्हटले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आश्वासन : योजनांच्या लाभार्थ्यांशी आॅनलाईन संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जेवर वीज निर्मिती करण्यासाठी फिडरचे काम सुरू आहे. नियमितपणे विद्युत उपलब्ध करुन देण्यासाठी सोलरवर विद्युत निर्मिती करणार असून फिडर जोडण्याचे काम सुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाईन लोकसंवादादरम्यान म्हटले.मागेल त्याला शेततळे, विंधन विहिरी, पिक विमा योजना अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. येथील एन. आय.सी. मधील कक्षात जिल्ह्यातील १५ लाभार्थी सहभागी झाले. शेतीतील उत्पादन वाढून त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध योजना शासन राबवित आहे. याकरिता १० हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्यात १६ हजार गावात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे पूर्ण झाली आहेत. १ लाख ३७ हजार शेततळे खोदण्यात आले. याकरिता गेल्या चार वर्षात एकूण ३४ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी संवादादरम्यान सांगितले.या लोकसंवाद कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते &महाराष्ट्र एग्रीटेक कार्यक्रमाचे शुभारंभ झाला. राज्यातील दीड कोटी शेतकºयांना या कार्यक्रमांतर्गत लाभ मिळणार आहे. प्रस्थापीत केलेल्या लघु ग्रहाशी थेट संपर्क करुन हवामानाच्या बदलासह, शेतीतील पेरणीपासून तर उत्पन्न हातात येईपर्यंत मधल्या काळात पिकावरील रोगांचीसुध्दा माहिती याअंतर्गत शेतकºयांना थेट उपलब्ध होणार आहे.संवादाप्रसंगी एन.आय.सी.चे अधिकारी एस. आर. टेंभूर्णे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, तसेच शेतकरी भोलेश समर्थ, रामकृष्ण तामशेटवार, दिलीप भुरसे, मोतीराम सेलोटे, यमराज बारसागडे, पुडलीक कोठारे, शामराव सातपुते, नेमाजी उंदिरवाडे, दिवाकर वाणी, प्रशांत वाघरे, संजय निखारे, मनोज नैकलवार, राजेश मेश्राम, देवेंद्र सरकार उपस्थित होते.