शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

देशात शिक्षण व आरोग्यावर खर्च कमी

By admin | Updated: March 23, 2015 01:27 IST

माणसाच्या विकासासाठी सुदृढ व निरोगी शरीर तसेच शिक्षण महत्त्वाचे आहे. भारत देशात आरोग्यावर केवळ १.०४ टक्के खर्च केला जातो.

गडचिरोली : माणसाच्या विकासासाठी सुदृढ व निरोगी शरीर तसेच शिक्षण महत्त्वाचे आहे. भारत देशात आरोग्यावर केवळ १.०४ टक्के खर्च केला जातो. विकसित देशात शिक्षणावर १२.३१ टक्के निधी खर्च होणे आवश्यक आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या भांडवलशाही वृत्तीमुळे आपल्या देशात आरोग्य व शिक्षण या महत्त्वपूर्ण बाबीवर अत्यल्प निधी खर्च केला जात आहे, असे प्रतिपादन आयआयटी खरगपूरचे प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केले. भारत जन आंदोलन व अखील भारतीय आदिवासी महासभेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गडचिरोली येथील संस्कृती सभागृहात आयोजित जनसंघर्ष राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. तेलतुंबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हिरामण वरखडे होते. यावेळी मंचावर आदिवासी महासभेचे राज्याध्यक्ष हिरालाल येरमे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, परिषदेचे समन्वयक महेश राऊत आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. डॉ. तेलतुमडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी १९४४ मध्ये काही भांडलवादी मंडळींनी आपल्या हितासाठी मुंबई प्लान बनविला होता. त्यावेळी सरकारने या प्लानमधील तरतुदी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये समाविष्ट केल्या. तेव्हापासूनच कष्टकरी समाजाचे शोषण सुरू झाले. सत्ताधाऱ्यांनी भांडवलवाद, खासगीकरण, उदारमतवाद आदींच्या नावांवर दलित व आदिवासींना धोका दिला, अशी टीका डॉ. तेलतुंबडे यांनी केली. शोषण व्यवस्थेमुळेच अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्याची तीव्र भावना आता जनतेमध्ये निर्माण होत आहे. त्यासाठी योग्य नियोजनबध्द आंदोलन छेडण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक महेश राऊत, संचालन अ‍ॅड. जगदीश मेश्राम यांनी केले तर अभार हिरालाल येरमे यांनी मानले. भाकपाचे देवराव चवळे, विनोद झोडगे, जि.प. सदस्य अमोल मारकवार, प्रभू राजगडकर, गंगाराम आतला, छाया पोटावी, वासुदेव आतला, मनोहर तोरे आदीसह भारतीय जनआंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)