शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

८७ लाख रूपयांच्या करमणूक कराची वसुली

By admin | Updated: April 1, 2015 01:35 IST

जिल्हा करमणूक कर विभागाच्या वतीने यावर्षी सुमारे ८७ लाख ४१ हजार रूपयांचा करमणूक कर गोळा केला आहे.

गडचिरोली : जिल्हा करमणूक कर विभागाच्या वतीने यावर्षी सुमारे ८७ लाख ४१ हजार रूपयांचा करमणूक कर गोळा केला आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १३ हजार ५०० केबल ग्राहक आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ३ हजार ९११, धानोरा ८७, चामोर्शी २ हजार ५१९, मुलचेरा ०, देसाईगंज २ हजार ४०२, आरमोरी १ हजार ४१४, कुरखेडा ४९२, कोरची ०, अहेरी १ हजार ९४०, भामरागड १६०, एटापल्ली १९० व सिरोंचा तालुक्यात ४०६ केबल ग्राहक आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार १५८ डीटीएच, ६ हजार ९४१ टाटास्कॉय, ३३६ रिलायन्स, २ हजार १८ सन टीव्ही, १ हजार २४५ एअरटेल, ३ हजार ९७६ भारत बिजनेस कंपनीच्या डिश आहेत. अशा एकूण २० हजार ६७४ डिश आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७१ केबल चालक आहेत. या केबल चालकांच्या मदतीने करमणूक कर भरल्या जाते. नगर परिषद क्षेत्रात ३० टक्के तर ग्रामीण भागात १५ टक्के करमणूक कर आकारल्या जाते. गडचिरोली जिल्ह्याला २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे एक कोटी रूपयांचा कर गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत ८७ लाख ४१ हजार रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. टक्केवारीचे प्रमाणही ८७.४१ टक्के एवढे आहे. विदर्भातील इतर सर्व जिल्ह्याचे करमणूक कर गोळा होण्याचे प्रमाण ९० टक्केपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्हा मागे आहे.गडचिरोली जिल्ह्यात केबल व डिश टीव्हींची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत करमणूक कर अत्यंत कमी प्रमाणात गोळा होतो. कोरची व मुलचेरा तालुक्यात एकही केबल कनेक्शन नाही. त्यामुळे या दोन तालुक्यातून केबलच्या माध्यमातून रूपयाचेही उत्पन्न प्राप्त होत नाही. संपूर्ण जिल्ह्यात केवळ एक चित्रपटगृह आहे. या चित्रपटगृहातूनही अत्यंत कमी प्रमाणात करमणूक कर गोळा होते. त्यामुळे वर्षभरात कोटीचाही महसूल गोळा होत नाही. (नगर प्रतिनिधी)