शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

गडचिराेलीत 119 जाेडप्यांचा विक्रमी सामूहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केले. आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या उपवधूंची गडचिराेली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्या संख्येने विवाहाचा भव्य मंडप फुलून गेला होता. रविवारी सकाळी दहा वाजता भूमकांच्या मंत्रोच्चारात विवाह विधी पार पडले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने गडचिराेली येथे आयाेजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह साेहळ्यात जिल्हाभरातील ११९ आदिवासी जाेडपी विवाहबद्ध झाली. नातेवाईक, मान्यवर व भूमकांच्या मंत्राेच्चारात विवाह साेहळा गडचिराेली येथील लाॅनवर पार पडला.    पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केले. आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या उपवधूंची गडचिराेली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्या संख्येने विवाहाचा भव्य मंडप फुलून गेला होता. रविवारी सकाळी दहा वाजता भूमकांच्या मंत्रोच्चारात विवाह विधी पार पडले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाला आ. डाॅ. देवराव होळी, आ. कृष्णा गजभिये, एसपी अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पाेलीस अधीक्षक सोमय मुंडे, एसडीपीओ प्रनिल गिल्डा, एपीआय महादेव शेलार, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, जिल्हा बँक अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, मैत्री परिवारचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, बाळासाहेब वरखेडे, सुनील चिलेकर, निरंजन वासेकर, घिसुलाल काब्रा, डॉ. उपेंद्र कोठेकर, पंडित पुरके आदी उपस्थित हाेते.  पाेलीस विभाग नक्षली कारावायांना आळा घालण्याबराेबरच आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने झटत आहे. आदिवासी आमचेच कुटुंबीय असून त्यांना मदत करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे,संचालन प्रा. माधुरी यावलकर व महादेव शेलार तर आभार एसडीपीओ प्रनिल गिल्डा यांनी मानले. 

संसाराेपयाेगी साहित्य भेट

विवाहित जाेडप्यांना कपडे, पादत्राणे, संसारोपयोगी साहित्य, नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आदींचे वितरण करण्यात आले.धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, एटापल्ली, हेटरी, भामरागड, सिरोंचा व आत्मसमर्पित नक्षल्यांचे  असे एकुण १० झोन करण्यात आले होते.पोलिसांनी घरचाच विवाह असल्याच्या आनंदात मिरवणुकीत नाचण्याची हौस पूर्ण केली.विवाहासाठी भव्य मंडप उभारण्यात आला हाेता. अगाेदरच्या दिवशी आलेल्या जाेडप्यांची राहण्याची व्यवथा केली हाेती. 

मुलांनीही बघितला आई-वडिलांचा विवाह   काही जोडपी आधीपासूनच ‘लिव्ह-इन’ मध्ये राहत होती. त्यामुळे या आदिवासी जोडप्यांपैकी अनेकांना एक किंवा दोन मुले होती. त्यांची मुलेही त्यांच्या विवाहाची साक्षीदार ठरली. हा विवाह साेहळा संस्मरणीय ठरला.

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस