शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

‘या’ कारणासाठी सापांचे संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:47 IST

सापांविषयी असलेल्या अज्ञानामुळे असंख्य बिनविषारी सापांचा दरवर्षी बळी घेतला जातो. विषारी व बिनविषारी सापांना न मारता सुरक्षितस्थळी वस्तीपासून दूर ठेवल्यास जैैवविविधता कायम राहील.

ठळक मुद्देअज्ञानामुळे जातो असंख्य सापांचा बळीविषारी व बिनविषारी सापांना न मारता वस्तीपासून दूर ठेवण्याबाबत जनजागृतीचा अभाव

गोपाल लाजूरकरलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा सुरू होताच जमिनीत दडून बसलेले सरपटणरे जीवजंतू बाहेर पडतात. दुसऱ्या प्राण्यांनी केलेल्या बिळात राहणारे सापसुद्धा बिळांतून बाहेर येतात. अनेकदा यातील विषारी प्राण्यांमुळे मानवी जीवाची हानी होते. त्यामुळे संपूर्ण पावसाळाभर खबरदारी घेणे आवश्यक आहे. सतर्क राहिल्यास विषारी प्राण्यांपासून विशेषत: सापांपासून होणारा दंश टाळता येतो. गडचिरोली जिल्ह्यात चार जातीचे विषारी साप आढळतात. मात्र, सापांविषयी असलेल्या अज्ञानामुळे असंख्य बिनविषारी सापांचा दरवर्षी बळी घेतला जातो. विषारी व बिनविषारी सापांना न मारता सुरक्षितस्थळी वस्तीपासून दूर ठेवल्यास जैैवविविधता कायम राहील.

बिनविषारी सापविषारी, निमविषारी सापासह बिनविषारी सापसुद्धा जिल्ह्यात आढळतात. यात अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धूळनागीण, तस्कर, कवड्या, कुकरी, वाळा, डुरक्या घोणस, मांडूळ, रूका, ब्लॅक हेडेड (काळतोंड्या) आदींचा समावेश आहे. मांडूळ, गवत्या (दोन तोंडया) आदी दुर्मीळ साप आहेत. या सापांपासून धोका नसतानाही भीतीपोटी नागरिक त्यांना मारुन टाकतात. त्यामुळे या सापांबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.विषारी सापगडचिरोली जिल्ह्यात विविध प्रजातींचे साप आढळून येतात. मात्र विषारी सापांमध्ये नाग, घोणस, मण्यार, फुरसे आदी सापांचा समावेश आहे. मण्यार सापाच्या दोन प्रजाती आहेत. यामध्ये काळा पांढºया गोलाकार पट्ट्यांचा व काळ्या-पिवळ्या पट्ट्यांचा पट्टेरी मण्यार आदींचा समावेश आहे. चार प्रजातीचे साप जहाल विषारी आहेत. विषारी सापाच्या दंशाने उपचाराअभावी जीवितहानी होऊ शकते.

असा करावा प्राथमिक उपचारसर्पदंश झाल्यानंतर अनेकवेळा प्रथमोपचाराअभावी रूग्ण दगावतात. तर काही ठिकाणी औषधोपचाराअभावी रूग्ण दगावतो. अनेकदा भीतीनेही रुग्ण दगावल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर देणे आवश्यक आहे.सर्पदंश झालेल्या जागी प्रचंड वेदना होतात. साप विषारी असेल तर त्याच्या दोन दातांचा चावा लवकर लक्षात येतो. साप बिनविषारी असेल तर अर्धलंब वर्तुळाकार दातांच्या पंक्ती दिसतात. साप विषारी किंवा बिनविषारी असतानाही सदर व्यक्तीला वेदना होतात. अशावेळी घाबरून न जाता दंश झालेल्या ठिकाणापासून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी.घरात असलेली रिबिन, कपड्याची पट्टी, दोरी यापैकी कशाचाही त्यासाठी उपयोग करता येतो. घट्ट आवळून बांधल्यामुळे विष शरीरात पसरणार नाही आणि वैद्यकीय उपचारासाठी वेळ मिळतो.सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यावर रुग्णाला धीर द्यावा . त्याला तोंडावाटे खाण्यासाठी काहीही देऊ नये. मोकळी हवा त्याच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी. काही वेळेत त्याला ग्लानी येण्याची शक्यता असल्याने एकटे न सोडता सोबत राहावे.निसर्गाच्या अन्नसाखळीत सापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील किटक, डासांच्या अळ््या, घुशी यावरही साप नियंत्रण ठेवतो. विषारी सापाच्या विषापासून गंभीर रोगावर लस तयार केली जाते. त्यामुळे सापाला न मारता, त्यांचे रक्षण करावे. नाहीतर अन्नसाखळी मोडून निसर्गाचा समतोल बिघडायला वेळ लागणार नाही.अजय कुकडकर, सर्पमित्र व वन्यजीवप्रेमी, गडचिरोली

टॅग्स :wildlifeवन्यजीवsnakeसाप