शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेशन वाटपात तंत्रज्ञानाचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:52 IST

रेशनच्या धान्य वाटपात पारदर्शकता आणून गैरव्यवहार टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ११९५ रेशन दुकानदारांमध्ये पॉस मशिन लागल्या आहेत.

ठळक मुद्दे१५ टक्के काम आॅफलाईन : आधार लिंकिंग व इंटरनेट समस्या, सरकारी सॉफ्टवेअरची गती मंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेशनच्या धान्य वाटपात पारदर्शकता आणून गैरव्यवहार टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ११९५ रेशन दुकानदारांमध्ये पॉस मशिन लागल्या आहेत. मात्र या यांत्रिकीकरणाला तंत्रज्ञानाची योग्य साथ मिळत नसल्यामुळे अजूनही १५ टक्के धान्य वाटपासाठी ‘आॅफलाईन’ पद्धतीचा वापर करावा लागत आहे.मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असलेल्या या जिल्ह्यात डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी गावागावात इंटरनेटचे जाळे पसरणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात अनेक नवीन टॉवरही मंजूर झाले आहेत. पण त्यांची उभारणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे कोरची, अहेरी, भामरागडसारख्या तालुक्यांमध्ये बºयाच गावांमध्ये इंटरनेटचे रेंज पोहोचलेली नाही. हे कव्हरेज नसताना पॉस मशिनचा वापर करून कॅशलेस व्यवहार करताना स्वस्त धान्य दुकानदारांना मोठी कसरत करावी लागत आहे. जानेवारी महिन्यात २९ तारखेपर्यंत ६६ टक्के गहू-तांदळाचे वाटप पॉस मशिनने झाले होते. दोन दिवसा हे प्रमाण आणखी वाढले असले तरी ते १०० टक्के होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ८५३ रेशन कार्डधारक आहेत. मात्र ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना डिजीटल व्यवहार कसे करायचे याची माहितीसुद्धा नाही. असे असताना जानेवारी महिन्यात २९ तारखेपर्यंत १ लाख ३० हजार ९ कार्डधारकांचे व्यवहार पॉस मशिनने झाले होते.धान्य वाटपातील अफरातफर थांबवून संबंधित व्यक्तीलाच त्याचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड आधार लिंक केले जात आहेत. आता हे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. बहुतांश लोक तहसील कार्यालयातील यंत्रणेला हाताशी धरून रेशन कार्डवर कमी उत्पन्न दाखवत स्वस्त धान्याचा लाभ घेतात. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेकांच्या नावे रेशन कार्ड बनविण्यात आले आहेत. परंतू रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केल्यामुळे कोणत्या कुटुंबात किती सदस्य आहेत हे समजण्यासोबतच कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न व इतर बाबीही दिसून येतात. त्यामुळे या यंत्रणेतील भ्रष्ट कारभारावर नियंत्रण येईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.देसाईगंज आघाडीवर, कोरची मागेरेशन वाटपाच्या डिजीटल व्यवहारात देसाईगंज तालुका गडचिरोलीपेक्षाही पुढे असल्याचे दिसून येते. तर कोरची तालुका या बाबतीत सर्वात मागे आहे. २९ जानेवारीपर्यंत कोरची तालुक्यात अवघ्या १७ टक्के रेशन कार्डधारकांचे व्यवहार पॉस मशिनने झाले होते. त्यामुळे सरकारी यंत्रणेने या तालुक्यातील समस्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे झाले आहे. ज्या ठिकाणी धान्य वाटप आॅफलाईन पद्धतीने सुरू आहे त्या ठिकाणी पॉस मशिननेच व्यवहार केले जातात, पण नंतर त्यातून होणाऱ्या व्यवहारांची माहिती शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी तहसील कार्यालयात किंवा नजिकच्या नेटवर्क असलेल्या गावात धाव घ्यावी लागते.अशा आहेत डिजिटल तंत्रज्ञानातील अडचणीजिल्ह्यातील ११९५ रेशन दुकानांपैकी सर्व दुकानांमध्ये आता पॉस मशिन बसविल्या आहेत. त्या सरकारी यंत्रणेशी लिंकअपसुद्धा करण्यात आल्या. पण पॉस मशिनद्वारे व्यवहार करताना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.९४ टक्के कार्डधारकांचे आधार लिंक झाले असले तरी अजून ७ हजारांवर नागरिकांचे आधार लिंक बाकी आहे. काही लोकांच्या आधार कार्डमधील नावे आणि कार्डवरील नावांमध्ये थोडाफार बदल आहे. ही अडचण दूर करून डेटा क्लिनिंग करण्याचे काम सुरू आहे.विशेष म्हणजे ज्या सरकारी साईटवर ही माहिती दररोज अपलोड होते ते सॉफ्टवेअर अत्यंत धिम्या गतीने काम करीत आहे. त्यामुळे माहिती अपलोड करताना सरकारी दुकानदार, तहसील कार्यालयातील कर्मचाºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.