शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचात आढळला दुर्मीळ पांढरा साप, सुरक्षित सोडला जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:08 IST

अल्बिनो कोब्रा : मिलमधील एका खोलीत मजुरांना दिसला

कौसर खान

सिरोंचा (जि. गडचिरोली) : तब्बल ७० टक्के जंगलक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वन्यप्राण्यांसह सर्पांच्याही विविध जाती आढळतात, पण २१ मार्च रोजी पहिल्यांदाच दुर्मीळ अल्बिनो कोब्रा हा पांढरा विषारी साप आढळून आला. त्याला सुरक्षितरीत्या जंगलात सोडण्यात आले.

सिरोंचा येथे एक राइस मिल आहे. तेथे नित्याप्रमाणे मजूर काम करत होते. या मिलमधील एका खोलीत मजुरांना पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ साप आढळून आला. या सापाला पाहून मजूर भयभीत झाले. त्यानंतर त्यांनी त्यास मारून टाकण्याचा प्लॅन केला ; परंतु एका मजुराने परिचयातील सर्पमित्र व सिरोंचा ठाण्याचे हवालदार नईम शेख यांना पाचारण करून त्या सापाला जीवदान देऊ, असे सांगितले. इतर मजुरांनीही यास होकार दिला. त्यानंतर तातडीने नईम शेख यांना पाचारण केले. त्यांनी आपल्या कौशल्याने हा साप पकडला व सिरोंचा परिसरातील डोंगरात सोडून दिला.

काय आहे पांढऱ्या सापाचे वैशिष्ट्य

अल्बिनो कोब्रा नावाने ओळखला जाणारा हा साप कोब्रा प्रजातीतील आहे. सापाची वाढ कमी असते. मात्र, हा साप पूर्ण वाढलेला होता. त्वचेचा होणाऱ्या अल्बिनझम या आजारामुळे त्वचा पांढरी होते. फणा काढणारा हा साप विषारी असतो.

अल्बिनो कोब्रा गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला आहे. हा साप दुर्मीळ आहे. यंदा सिरोंचा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हा साप पाण्यासोबत वाहून आल्याचा अंदाज आहे. सापाला जंगलात सोडले आहे.

- नईम शेख, सर्पमित्र सिरोंचा

टॅग्स :snakeसापwildlifeवन्यजीवGadchiroliगडचिरोली