धानोरा : होऊ घातलेली धानोरा नगर पंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश सरचिटणीस रिंकू पापडकर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण हरडे, माजी सभापती विजय कावळे, धानोरा तालुक्यातील ज्येष्ठ नेते सोपानदेव म्हशाखेत्री, प्रकाश धाईत, भास्कर चन्नेवार, समीर कुरेशी, अभय इंदूरकर, केशवराव दळांजे, तुकाराम गडपायले, अदिलाबानो शेख, जास्वंदा मडावी, अर्चना राऊत, राजू ठाकरे, झाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धानोरा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धानोरा येथे पहिल्यांदाच नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे. यापूर्वी राज्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अपयश आले. मात्र या अपयशाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सज्ज राहावे, ही निवडणूक स्वबळावर लढली जाईल, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
राकाँ स्वबळावर लढणार
By admin | Updated: September 1, 2015 01:26 IST