शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

रायपूर- विशाखापट्टणम् ग्रीनफिल्ड महामार्गाला गडचिरोलीशी जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:30 IST

नितीन गडकरी यांची ग्वाही : वनविभागाच्या अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात वनक्षेत्र, खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. येथे उद्योगाला वाव आहे, पण त्यासाठी चांगले रस्ते, दळणवळण, पाणी व वीज या बाबी गरजेच्या आहेत. मात्र, वनविभागातील काही अधिकाऱ्यांनी कामे अडवून ठेवली आहेत. हे झारीतील शुक्राचार्यच खरे समस्यांचे मूळ आहेत. स्वतः एक झाड लावत नाहीत अन् सामान्यांच्या हिताचे प्रकल्प अडवून ठेवतात, अशी कानउघाडणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

रायपूर- विशाखापट्टणम् या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाशी गडचिरोलीला जोडणार आहे. हा मार्ग धानोरातून छत्तीसगडला जोडला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा राज्यात सर्वात सुखी, समृध्द व संपन्न बनेल, असा विश्वास त्यांनी दिला. विकास करणाऱ्यांच्या मागे उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली.

चामोर्शीतील आष्टी येथे अहेरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंत्री धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे तसेच कुरखेडा येथे आरमोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांनी १५ नोव्हेंबरला दोन सभा घेतल्या. आष्टीतील सभेत मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांची उपस्थिती होती तर कुरखेडाच्या सभेत मंचावर राज्य सहकार महामंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा. पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, पद्मश्री परशुराम खुणे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सा. पोरेड्डीवार, भाजपचे समन्वयक किशन नागदेवे उपस्थित होते.

...तर गडचिरोलीचे जमशेदपूर झाले असते नितीन गडकरी म्हणाले, जमशेदपूर येथे स्टील प्रकल्प उभारण्यापूर्वी जमशेद टाटा हे गडचिरोलीत घोड्यावरुन आले होते. सुरजागड येथे त्यांनी पाहणी केली होती, पण त्यांना वनविभागाने परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांनी झारखंडमध्ये जमेशदपूरला टाटानगर बनवले. तेथे लाखो लोकांचे जीवनमान बदलले. हे तेव्हा गडचिरोलीत झाले असते तर इथल्या लोकांना फाटके कपडे घालण्याची वेळ आली नसती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सुरजागड येथे लोहउत्खनन होत आहे, पण तेथे ड्रायव्हिंग स्कूल, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग कॉलेज सुरु व्हावे, ९० टक्के स्थानिकांना रोजगार मिळावा, असे मी बजावले आहे. अन्यथा उद्योग बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

धर्मरावबाबांच्या आग्रहास्तव रस्त्यासाठी एक हजार कोटी मंजूर यावेळी गडकरी म्हणाले, मी मंत्री झाल्यानंतर गडचिरोलीत ४ हजार कोटी रुपयांतून ३५ कामे केली. आष्टी- सिरोंचा या महामार्गासाठी मंत्री धर्मरावबाबांचा सतत पाठपुरावा होता. त्यांच्या आग्रहास्तव एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, वनविभाग व वन्यजीव विभागाच्या परवानग्या मिळणे बाकी आहे. आतापर्यंत जिल्ह्याचा विकास रखडण्यामागे वनविभागाचेच अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याविरुध्द आंदोलने करा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, गडकरी यांनी धर्मरावबाबा यांच्या सभेला उपस्थित राहून पाठराखण करत बंडखोरांना सूचक इशारा दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीGadchiroliगडचिरोली