शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावसाने गाठली सरासरी; गडचिरोली जिल्ह्यातील तलाव भरले तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 13:28 IST

सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे.

ठळक मुद्देआठ तालुक्यांमध्ये मात्र अजूनही कमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अपेक्षित सरासरीची कसर भरून काढली असून २३ ऑगस्टपर्यंत जिल्हयात अपेक्षित पावसाच्या ९९.९ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९५४.५ मिमी पाऊस झाला आहे. अजुनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवस पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास अपेक्षित सरासरीच्या अधिकचे पाऊस पडू शकते. आता रोवणीची कामे आटोपली असून निंदनाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडते. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होते. धानपिकाला शेवटपर्यंत पाण्याची गरज भासते. अशा वेळी तलाव, बोड्यांमधील पाणी धान पिकाला दिले जाते. मागील आठ दिवसात झालेल्या पावसामुळे तलाव, बोड्या पूर्णपणे भरल्या आहेत. पाऊस सुरूच असल्याने पुन्हा १५ दिवस तलाव, बोड्यांच्या पाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर मात्र तलावबोड्या भरल्या असल्याने शेतकरी निश्चिंत आहेत.

देसाईगंज तालुक्यात सर्वात कमी पाऊसयावर्षी देसाईगंज तालुक्यात सर्वात कमी म्हणजे, केवळ ६९१.३ मिमी पाऊस पडला आहे. या तालुक्यात २३ ऑगस्टपर्यंत ९८६.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ६९१.३ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित सररासरीच्या ७०.१ टक्के एवढा पाऊस झाला आहे. धानोरा तालुक्यात केवळ ७३९ मिमी पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या ६९.२ टक्के एवढा आहे. गडचिरोली तालुक्यात ११०१.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७५५.४ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या केवळ ६८.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. कुरखेडा तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ८७.५, आरमोरी ७९.७,चामोर्शी ९५.४, एटापल्ली ९४.२, कोरची ६९.२, देसाईगंज ७०.१ मिमी पाऊस झाला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक १३६२.६ मिमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस