शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यातच पडला वर्षभराचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. ही चार महिन्यांची सरासरी यावर्षीच्या पावसाने कधीच गाठली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला. या तालुक्यात ५ सप्टेंबरपर्यंत सुमारे २१९९.०८ मिमी पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १५०२.३ मिलीमीटरची नोंद : अनेक वर्षातील पावसाचा रेकॉर्ड यावर्षी मोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संपूर्ण वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात १५०२.३ मिमी एवढा पाऊस पडतो. मात्र यावर्षी पावसाने कहर केला आहे. १ जून ते ५ सप्टेंबर या जेमतेम तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १५२८.३ मिमी पाऊस पडला आहे. पुन्हा ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस अनेक वर्षातील रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाळ्याचे समजले जातात. या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. ही चार महिन्यांची सरासरी यावर्षीच्या पावसाने कधीच गाठली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला. या तालुक्यात ५ सप्टेंबरपर्यंत सुमारे २१९९.०८ मिमी पाऊस पडला आहे. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात १७००.२ मिमी, अहेरी तालुक्यात १६०६.६ तर एटापल्ली तालुक्यात १६०८ मिमी पाऊस झाला आहे.गोसेखुर्द, संजय सरोवरचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा फुगलीभंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे २३ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे पाणी दुथडी भरून वाहात आहे. इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होऊन वाहात आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या सरोवराचेही पाणी वैनगंगा नदीला येऊन मिळते. जिल्ह्यातील प्रमुख नद्या असलेल्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी या नद्यांची पातळी चांगलीच वाढली आहे. वैनगंगा नदी इशारा पातळीच्या खाली वाहत आहे, मात्र प्राणहिता नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. दोन दिवसांपूर्वी इडियाटोह धरण ओव्हरफ्लो झाले. पाच वर्षानंतर हे धरण भरल्यामुळे त्याच्या नैसर्गिक सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ते पाणी जिल्ह्यातील काही नद्यांना मिळते.चामोर्शी शहरात १० घरांची पडझडसंततधार पावसामुळे चामोर्शी शहरातील नऊ घरांची अशंत: तर एका घराची पूर्णत: पडझड झाली आहे. पडझडीमुळे संबंधित घरमालकांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अभय गेडाम, विश्वनाथ करंडे, नक्टू गवारे, ऋषीदेव घोंगडे, बेबी गव्हारे, माया कुनघाडकर, सावजी चिमुरकर, लक्ष्मी पिपरे, वसंत येनगंधलवार यांच्या घराची अंशत: पडझड झाली तर विनोद कोटांगले यांच्या घरांच्या भिंती पूर्णत: कोसळल्या. याशिवाय प्रभूदास नैताम, इंदिरा देवतडे, वच्छला चलाख, गीता किनेकर यांच्या घरांची पडझड झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. कुनघाडा रै. येथील चामोर्शी-कुनघाडा या मुख्य मार्गावर असलेल्या धान शेती पूर्णत: पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सोमनपल्ली गावास पुराचा वेढाचामोर्शीच्या तालुक्यातील घोटपासून १५ ते २० किमी पासून असलेल्या सोमनपल्ली गावाला बुधवारी पुराने वेढा घातला. सदर गावात १४ घरे असून ५० च्या आसपास लोकसंख्या आहे. दुर्गम भागात हे गाव असून पाण्याने या गावाला चारही बाजुने वेढले होते. या घटनेची माहिती होताच चामोर्शीचे तहसीलदार संजय गंगथडे यांनी बोट व इतर कर्मचाऱ्यांसह सोमनपल्ली गावाकडे धाव घेतली. बोटीने व ट्रॅक्टरने पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत आबापूर नजीकच्या सोमनपल्ली या अतिदुर्गम गावात सायंकाळी ७ वाजता पोहोचले व तिथे मदतकार्य सुरू केले. गुरूवारी सकाळी महसूल विभागाच्या चमुने नागरिकांची भेट घेतली. नुकसानीचे पंचनामे केले. सर्वच घरात पाणी शिरले असल्याने बऱ्याच घरांची पडझड झाली. प्रशासनाच्या वतीने येथील प्रत्येक कुटुंबास १० किलो तांदूळ, तूर डाळ, तेल, तिखट आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. दुमजली असलेल्या एका घरात ५० लोकांनी आसरा घेतला.अतिवृष्टीच्या धोक्यामुळे शैक्षणिक संस्थांना सुटीप्रादेशिक हवामान केंद्राद्वारे देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाºयानंतर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ६ व ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे. शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांसह इतर शैक्षणिक संस्थांना दोन दिवस सुटी घोषित करण्यात आली आहे. मंगळवारपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग अजूनही आवागमनासाठी बंद आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थी मधेच कुठे अडकू नये व कुठलाही संभाव्य धोका टाळता यावा, या दृष्टीने प्रशासनाने सदर पाऊल उचलले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत अनेक भागात अतिवृष्टी झाली असून रस्त्याची स्थिती गंभीर बनली आहे. भामरागड तालुक्यासह बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा नागरिकांना फटका बसला आहे. एकूणच जिल्ह्यात आपतकालीन परिस्थिती उद्भवली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच दि.६ व ७ रोजी हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसांची सुटी जाहीर केली आहे. सोमवारी नियमित शाळा भरेल.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर