शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

गडचिरोली शहरात तंबाखू विक्रेत्यांवर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

शहरातील किराणा दुकानांतून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळवारी प्रशासन व मुक्तिपथच्या चमूने शहरातील चार दुकानांची झडती घेतली. यावेळी लपवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुढे कोणत्याही स्वरूपाचा तंबाखू, उत्पादनाचे साधन, खर्रा मशीन आढळल्यास कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशीही सूचना या तपासणी दरम्यान दुकानदारांना देण्यात आली.

ठळक मुद्देएक मशीन जप्त : पालिका, पोलीस व मुक्तिपथची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील तीन ते चार किराणा दुकाने व एका पानठेलाधारकाच्या घरी मंगळवारी धाड टाकून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, नगर परिषद, पोलीस विभाग व मुक्तिपथने संयुक्तपणे कारवाई केली. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अंतर्गत कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री होऊ नये, या हेतूने सदर कारवाई करण्यात आली.शहरातील किराणा दुकानांतून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळवारी प्रशासन व मुक्तिपथच्या चमूने शहरातील चार दुकानांची झडती घेतली. यावेळी लपवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुढे कोणत्याही स्वरूपाचा तंबाखू, उत्पादनाचे साधन, खर्रा मशीन आढळल्यास कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशीही सूचना या तपासणी दरम्यान दुकानदारांना देण्यात आली. रेड्डी गोडावून परिसरातील एका पानठेलाधारकाच्या घरी दुकानातील खर्रा बनविण्याची मशीन सापडली. ती जप्त करून पाच हजार रुपये दंड ठोठावला. याशिवाय आरमोरी मार्गावरील एका किराणा दुकानात धाड टाकून तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच एका पान मटेरिअलच्या दुकानात धाड टाकली असता, येथेही तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा प्रमुख डॉ. नंदू मेश्राम, नगर परिषदेच्या कोविड -१९ भरारी पथकातील अखिल चव्हाण, न. प. चे प्रभारी अधीक्षक एस. पी. भरडकर, पोलीस विभागाचे बेसरकर, रायपुरे, मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता आणि उपसंचालक संतोष सावळकर, अमोल वाकुडकर, रेवनाथ मेश्राम यांच्या पथकाने केली आहे.आठ किराणा दुकानांमधून तंबाखू जप्तआरमोरी : लॉकडाऊनचा फायदा घेत किराणा दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आरमोरी शहरातील आठ दुकानांवर सोमवारी छापे टाकण्यात आले. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. तहसील कार्यालय व मुक्तिपथने संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. किराणा दुकाने अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने विशिष्ट कलावधिकारिता ती उघडण्याची परवानगी आहे. पण ही संधी साधून किराणा दुकानदार तंबाखूजन्य पदार्थाची साठेबाजी व विक्री करीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयातील कर्मचारी व मुक्तिपथने मिळून सोमवारी शहरातील आठ किराणा स्टोअर्समध्ये छापे टाकले असता मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य साहित्य सापडले. यामध्ये जाफराणी जर्दा, खर्रा पन्नी, नस, गुडाखू यासह इतरही तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे.हा सर्व मुद्देमाल तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. याप्रकरणी आठही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नायब तहसीलदार वाय.डी.चाफले, तलाठी पी.बी.गजभिये, कोतवाल योगेश कुमरे आणि मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिणखेडे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी