शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशासाठी रजत पदक मिळविणाऱ्या राहुल मेश्रामची परिस्थितीशी फाइट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:57 IST

अतिदुर्गम जिमलगट्टात चालवतो हॉटेल : किर्गिझस्थानच्या स्पर्धेसाठी निवड

संजय गज्जलवार

जिमलगट्टा (गडचिरोली) : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम जिमलगट्टा गावचा भूमिपुत्र राहुल मेश्राम हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत बॉक्सर खेळाडू आहे. यापूर्वी देशासाठी रजतपदक मिळविणारा राहुल पुढील महिन्यात किर्गिझस्थानमध्ये होऊ घातलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव रोशन करणाऱ्या या खेळाडूची आर्थिक परिस्थितीशी फाइट सुरू आहे. गावी हॉटेल चालवून त्याला उदरनिर्वाह भागवावा लागत आहे.

किर्गिझस्थान येथे रशियन आर्मी गेममधील बॉक्सिंग स्पर्धेत ७३ किलो वजनगटात राहुल मेश्रामचा भारतीय संघात समावेश आहे. ही स्पर्धा २३ ते २६ जुलैदरम्यान होणार आहे. याआधी २०१६ मध्ये दिल्लीत झालेल्या जागतिक मॅप गेममध्ये राहुलने भारताचे प्रतिनिधित्व करताना रजतपदक प्राप्त केले होते. आतादेखील त्याच्याकडून देशवासीयांना अपेक्षा आहेत.

आई अंगणवाडी सेविका, वडील मजूर

राहुल सुरेश मेश्राम हा मोठ्या बिकट परिस्थितीतून पुढे आला आहे. त्याचे वडील मजुरीकाम करत, तर आई अंगणवाडी सेविका होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यास बॉक्सिंगची आवड निर्माण झाली. त्याची चुणूक पाहून मोठ्या जिद्दीने आई-वडिलांनी त्यास पुण्याला प्रशिक्षणासाठी पाठवले, तेथेच त्याची कारकिर्द बहरली. मार्शल आर्टचे प्रशिक्षण प्रदीप शिंदे यांच्याकडून घेतले. या प्रवासात प्रदीप शिंदेंसह संतोष कुमार, रवी चर्लावार यांचे योगदान असल्याचे राहुल सांगतो.

खासगी शाळेत प्रशिक्षक म्हणून केले काम

घरची हलाखीची परिस्थिती असल्याने राहुल मेश्रामने प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यातच एका खासगी शाळेत काही दिवस प्रशिक्षक म्हणून काम केले. २०१३ मध्ये त्याने पुण्यात झालेल्या राष्ट्रस्तरीय स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले. २०१६ मध्ये रजत पदक पटकावल्यावर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून त्याची निवड झाली. सन २०२३ मध्ये आग्रा येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे त्याची आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

परिस्थितीशी करतोय दोन हात

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव गाजविणाऱ्या राहुल मेश्राम या भूमिपुत्राची आर्थिक स्थिती आजही जेमतेम आहे. जिमलगट्टा येथे तो छोटेसे हॉटेल चालवून कुटुंबाचा गाडा चालवतो. मात्र, परिस्थितीशी दोन हात करून त्याने बॉक्सिंगची आवड जपली आहे.

स्पर्धेसाठी जायला नाहीत पैसे

किर्गिझस्थान येथील स्पर्धेसाठी जाण्याकरिता राहुल मेश्रामकडे पैसे नाहीत. यापूर्वी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यास आर्थिक साहाय्य केले; शिवाय मित्रपरिवार व परिसरातील दानशूर तसेच क्रीडाप्रेमी नागरिकही त्याच्यासाठी सरसावलेले आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली