शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

रबीचे क्षेत्र यंदा वाढले

By admin | Updated: December 18, 2014 01:02 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सवलतीवर शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याने यंदा रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले ...

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सवलतीवर शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याने यंदा रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले असल्याचे दिसून येते. १० डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत जिल्हाभरात एकूण २७ हजार २२ हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी पिकाची पेरणी ३ हजार ५४१.५५ हेक्टरवर तर गव्हाची पेरणी ४४५.१५ हेक्टरवर करण्यात आली आहे. मक्का १,७२१.७०, हरभरा ३,२६६ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. ९,६२० हेक्टर क्षेत्रावर लाखोळी तर १,५१४ हेक्टर क्षेत्रावर मुंगाची पेरणी करण्यात आली आहे. ७ हेक्टरवर मसूर तर १,०४५ हेक्टरवर पोपट पिकाची पेरणी करण्यात आली आहे. १,३९१ क्षेत्रात उडीद, १३६ हेक्टर क्षेत्रात वटाणा, १५ हेक्टरमध्ये वाल, ४२२ हेक्टर क्षेत्रात बरबटी आणि ६७३ हेक्टर क्षेत्रात कुलधा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात ज्वारी, गहू, मक्का, हरभरा, लाखोळी, मूंग, मसूर, पोपड, उडीद, वटाणा, वाल, बरबटी आदी प्रकारच्या रब्बी पिकांची पेरणी २,१०२ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. चामोर्शी तालुक्यात ७,९९१.२, धानोरा तालुक्यात ३,४५६, मुलचेरा तालुक्यात ४७५.४ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. देसाईगंज तालुक्यात २,५१२.६, आरमोरी तालुक्यात ३,१९४, आरमोरी तालुक्यात २,२८७, कुरखेडा तालुक्यात ६३५, कोरची तालुक्यात ८,६२८.८, अहेरी तालुक्यात १,८१०.४, एटापल्ली तालुक्यात ३०९.७, भामरागड तालुक्यात १९६.१ व सिरोंचा तालुक्यात २,०५१ हेक्टर क्षेत्रात यंदा रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली आहे.इतर कडधान्यांमध्ये मोडणाऱ्या जवस, सूर्यफूल, तीळ व करडई पिकांचीही जिल्ह्यात पेरणी करण्यात आली आहे. १,९९२ हेक्टर क्षेत्रात जवस, १०१ हेक्टर क्षेत्रात सूर्यफूल, २२९ हेक्टर क्षेत्रावर तीळ पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. ५०९ हेक्टर क्षेत्रामध्ये भूईमुंग व २६९ हेक्टर क्षेत्रावर मोहरी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. जिल्हाभरात भूईमुंग व मोहरी आदी गळीत पिकाची पेरणी ३,०९९.२६ हेक्टर क्षेत्रात झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वटाणा लागवडीत देसाईगंज तालुक्याची सरशीगडचिरोली जिल्ह्यात लाखोळी, गहू, ज्वारी, मक्का, हरभरा, उडीद, पोपट आदी रब्बी पिकांची लागवड करण्यात येते. यंदाच्या रब्बी हंगामात देसाईगंज तालुक्यात ७०.७ हेक्टर क्षेत्रामध्ये वटाणा पिकाची लागवड करण्यात आली आहे. आरमोरी तालुक्यात ३६, कुरखेडा तालुक्यात २२, कोरची तालुक्यात ७.४ असे एकूण १३६ हेक्टर क्षेत्रात वटाणा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. केवळ धानाचे पीक घेणे परवडत नाही, असे लक्षात आल्यावर यंदा प्रथमच चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून १० क्विंटल बियाणे घेऊन वटाणा पिकाची पेरणी केली आहे.२,१३७.६० क्विंटल हरभरा बियाणे वितरितजिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बियाणे सहज उपलब्ध व्हावे, याकरिता सवलतीमध्ये रब्बी पिकांचे बियाणे वितरीत करण्यात आले. जि. प. च्या कृषी विभागामार्फत यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना २ हजार १३७.६० क्विंटल हरभरा बियाणे वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली आहे. २८२.८० क्विंटल गहू तर ३४.२० क्विंटल मका बियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.