शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रबी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:17 IST

देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात.

ठळक मुद्देअनेक भागात रोगांचाही प्रादुर्भाव : जिल्हाभरातील शेतकरी हवालदिल; कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने ही पिके धोक्यात आली आहे. खरीप हंगामातील अर्धे पीक हातून गेल्यानंतर पुन्हा रबी हंगामात निसर्गाची वक्रदृष्टी पाहून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या धान पिकाची मळणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या भागातील शेतकरी धानपीकासह शेतातल्या बांधावर तूर हे आंतरपीक म्हणून घेतात. आपल्या उत्पादनात चांगली आर्थिक मदत म्हणून शेतकरी तूर व रबी हंगामातील इतर पिकांकडे पाहत असतात. मात्र गेल्या शुक्रवारपासून सूर्याचे दर्शन होत नसून वातावरणात धुकेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणात मंद गारवा पसरला आहे. परिणामी फुलोऱ्यावर येऊन भरत असलेल्या शेंगांवर अळी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम पडणार असल्याची शक्यता शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे.विसोरा गावालगतच्या शेतात धान पिकाच्या कापणीचे काम पूर्ण झाले असल्याने बांधावरील तूर पिकाने शेत परिसर आता हिरवागार दिसत आहे. त्यात तूर पीक फुलावर असून हिरव्या रंगात पिवळसर छटा असल्याचे भासते. परंतु मागील तीन दिवसांपासून दिवसभर सूर्यकिरणे एखाद्याक्षणी बाहेर निघत आहेत. परिणामी ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला धोका निर्माण झाला आहे. फूल फुलून शेंगांमध्ये दाणा भरण्यास सुरूवात झाली असताना, अशावेळी सुर्याची वक्रदृष्टी झाल्याने तूर पिकाच्या शेंगावर काळी व पांढऱ्या रंगाची अळी पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ढगाळ वातावरण असेच कायम राहिल्यास फुलोरा प्रभावित होऊन त्याचा थेट परिणाम तूर पिकावर होण्याची शक्यता आहे.देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात मूग, उडीद, चणा, लाखोळी आदी पिकांची यंदा लागवड करण्यात आली आहे. ही पिके सुध्दा भरण्याच्या मार्गावर आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे या पिकांना सुध्दा धोका निर्माण झाला आहे. आधीच खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांवर दुष्काळाचे संकट कोसळले.आता रबी हंगामातही दुष्काळजन्य परिस्थिती दिसून येत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती