शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

८६ केंद्रांवरून नऊ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:45 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या चालू वर्षातील खरीप हंगामात १५ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्हाभरातील ८६ केंद्रांवरून एकूण ९ लाख २ हजार ८८२ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली असून या धानाची एकूण किंमत १५८ कोटी रुपये आहे.

ठळक मुद्दे३१ मार्च पर्यंत चालणार हंगााम: गतवर्षीपेक्षा यंदा आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या चालू वर्षातील खरीप हंगामात १५ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्हाभरातील ८६ केंद्रांवरून एकूण ९ लाख २ हजार ८८२ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली असून या धानाची एकूण किंमत १५८ कोटी रुपये आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५१ तर अहेरी कार्यालयांतर्गत ३५ अशा एकूण ८६ केंद्रांवरून जिल्हाभरात धानाची खरेदी सुरू आहे. महामंडळाच्या वतीने आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी सुरू असून साधारण प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ७५० रुपये इतका हमीभाव दिला जात आहे. महामंडळाच्या सर्वच केंद्रावर साधारण धानाचीच आवक झाली आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५१ केंद्रांवर १५ मार्चपर्यंत एकूण ६ लाख ४९ हजार ३३७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३५ केंद्रावरून ४४ कोटी ३७ लाख रुपये किमतीच्या २ लाख ५३ हजार ५४४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. महामंडळाच्या केंद्रावर जिल्ह्यातील एकूण ३० हजार २७१ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धानाची विक्री केली आहे. यामध्ये १३ हजार ५४५ आदिवासी व १६ हजार ७२६ गैरआदिवासी शेतकऱ्यांचा समावेश आहे.कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत कढोली, नान्ही, गोठणगाव, गेवर्धा, आंधळी, देऊळगाव, सोनसरी, खरकाडा, पलसगड आदी १० केंद्रांवरून एकूण २५ कोटी ८७ लाख २६ हजार रुपये किमतीच्या १ लाख ४७ हजार ८४३ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मसेली, बेतकाठी, कोरची, मरकेकसा, कोटरा, कोटगूल, रामगड, पुराडा, खेडेगाव, येंगलखेडा, मालेवाडा आदी १३ केंद्रांवरून एकूण १ लाख ५८ हजार ३७४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची एकूण किंमत २७ कोटी ७१ लाख ५४ हजार ८३२ रुपये इतकी आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत देलनवाडी, कुरूंडी माल, दवंडी, उराडी, अंगारा, पिंपळगाव, मौशीखांब, पोटेगाव, विहीरगाव आदी नऊ केंद्रांवरून १ लाख ३२ हजार ६५६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धानाची किंमत २३ कोटी २१ लाख ४८ हजार ९६२ रुपये आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मुरूमगाव, रांगी, दुधमाळा, धानोरा, कारवाफा, पेंढरी, मोहली, सुरसुंडी व सोडे आदी नऊ केंद्रांवरून ९६ हजार ८३९ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची किंमत १६ कोटी ९४ लाख ७१ हजार ८५५ रुपये इतकी आहे. घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मकेपल्ली, रेगडी, घोट, गुंडापल्ली, भाडभिडी, अड्याळ, सोनापूर, आमगाव, गिलगाव, मार्र्कंडा क. आदी १० केंद्र आहेत. या केंद्रांवरून एकूण १ लाख १३ हजार ६२२ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.४१ कोटींचे धान चुकारे प्रलंबितआदिवासी विकास महामंडहाच्या वतीने गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या एकूण २२ हजार २७६ शेतकऱ्यांना ११.६९ कोटी रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्यापही ४१ कोटी ५ लाख ९१ हजार ३१७ रुपयाचे चुकारे देणे शिल्लक आहे. महामंडळाच्या केंद्रांवर धानाची विक्री करूनही चुकाºयाची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने शेकडो शेतकरी अडचणीत आले आहेत. महामंडळ व आविका संस्थेच्या वतीने चुकारे अदा करण्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे बरेच शेतकरी खासगी व्यापाºयांना धानाची विक्री करून नगदी रक्कम घेतात.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड