शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

लॉयडस् मेटल विरोधात पुन्हा जनआक्रोश

By admin | Updated: April 8, 2017 01:43 IST

पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना मालकी हक्क प्रदान केलेल्या जंगलाची लॉयडस् मेटल कंपनीकडून तोड केली जात आहे.

एटापल्ली : पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना मालकी हक्क प्रदान केलेल्या जंगलाची लॉयडस् मेटल कंपनीकडून तोड केली जात आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी नागरिकांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. आदिवासींच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या लॉयडस् मेटल कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी जनहितवादी युवा समिती तसेच वनोेत्पादन मालकी हक्क जनसंघर्ष सभा तालुका एटापल्ली यांच्या वतीने राज्यपाल, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. एटापल्ली तालुक्यातील पांडे, हेडरी, मलमपहाडी, सूरजागड, हेटळकसा, मोहुर्ली या गावातील नागरिकांना पेसा कायद्याअंतर्गत वनोपजाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या वनोपजाच्या भरवशावरच येथील नागरिकांना रोजीरोटी प्राप्त होत आहे. आदिवासींची जीवन पद्धती, संस्कृती, रूढी, परंपरा, सामूहिक हद्द जंगलावर आधारित आहे. पेसा कायद्यानुसार गावाच्या सभोवताल असलेल्या नैसर्गिक संपत्तीचीही मालकी स्थानिक आदिवासींकडे सोपविण्यात आली आहे. यानुसार या परिसरातील खनिजसंपत्तीवर त्यांचाच हक्क आहे. सूरजागड, वाडे, कारमपल्ली पहाडीलगतच्या व सभोवतालच्या ग्रामसभा बांडे, हेडरी, मंगेर, मलमपहाडी, सूरजागड, मेंढेर, हेटळकसा, मोहुर्ली, नागुलवाडी गावांच्या व ग्रामसभांच्या परंपरागत हद्दीत येत असलेल्या कक्ष क्र. १९७, १९८, १९९, २२७, २२८ मधील शेकडो हेक्टर आर क्षेत्रातील साधनसंपत्तीचे अधिकार नागरिकांकडे होते. जंगलातून मिळणारे तेंदू, बांबू, मोह, हिरडा, बेहडा, आवळा, चार, डिंक, मध, मेन, कंदमुळे, औषधी वनस्पतींच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून मजूर यंत्राच्या सहाय्याने येथील झाडांची तोड केली जात आहे. त्यामुळे आदिवासींचा रोजगार हिरावण्याबरोबरच त्यांचे आश्रयस्थानही धोक्यात आले आहे. त्यामुळे लायड्स मेटल कंपनीचे कंत्राटदार, यंत्रचालक, वाहक व अन्य सहकाऱ्यांवर कारवाई करावी, झालेल्या नुकसानीसाठी त्यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून तेवढी रक्कम वसूल करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून ग्रामकोष समितीचे सुरेश बारसागडे, हेडरीचे गावपाटील देवू कवडो, मलमपल्लीचे समन्वयक अशोक सोहन बडा, ग्रामसभा सूरजागडचे अध्यक्ष लालसाय तलांडे, ग्रामसभा हेडरीचे अध्यक्ष रामाजी दोहे पुंगाटी आदींनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एटापल्लीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार करून कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)