शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धान बांधणीनंतर पंचनामे; खरच मदत मिळणार का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस काेसळत आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामा करणारे पथक धानाची बांधणी झाल्यानंतर शेतात पाेहाेचत आहे. बांधणी झाल्यामुळे शेतात झालेेले नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची माेठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे. पावसामुळे तांदूळ काळा पडत असल्याने या धानाला फारसा भाव मिळत नाही. नुकसानीचा सर्व्हे अगदी वेळेवर हाेणे आवश्यक हाेते. मात्र नुकसानीचा पंचनामा करणारे पथक शेतात उशिरा पाेहाेचत आहे. काही शेतकरी कळपांची बांधणी करून पुंजणे टाकत आहेत. शेतात पथक पाेहाेचल्यानंतर नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे नुकसान न झाल्याचा शेरा लावला  जात  असल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धाेका निर्माण झाला आहे. 

पावसाचा जाेर सुरूचमागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर सुरू आहे. अधून-मधून पाऊस पडत असल्याने धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. पावसामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी व बांधणीची कामे लांबणीवर टाकली आहेत. धान पिकाच्या बांधणीचे काम लांबल्यास तांदळाची क्वालिटी बिघडत असल्याने फारसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. 

धानाला याेग्य भाव मिळणे कठीणपावसाने धान भिजल्यानंतर तांदूळ काळा पडते. या धानाला अतिशय कमी प्रमाणात भाव मिळते. यावर्षी धानाला शासनाने बाेनस अजूनही जाहीर केला नाही. परिणामी बहुतांश धान खासगी व्यापाऱ्यालाच विकावा लागणार आहे. अशातच धानही खराब झाल्याने धानाला अतिशय कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती