शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

रॅलीतून साक्षरतेवर जनजागृती

By admin | Updated: September 10, 2015 01:52 IST

८ सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त जिल्ह्यात अनेक गावांत महाविद्यालयांच्या वतीने रॅली काढून साक्षरतेबाबत जनजागृती करण्यात आली.

विविध कार्यक्रम: गडचिरोली, काटेपल्ली, इंदाराम, एटापल्लीत उपक्रमगडचिरोली : ८ सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त जिल्ह्यात अनेक गावांत महाविद्यालयांच्या वतीने रॅली काढून साक्षरतेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साक्षरतेवर विचारमंथन करण्यात आले. शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली : निरंतर प्रौढ शिक्षण व विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयातून रॅली काढून शहरात फिरविण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. पी. डी. घोरपडे व शिक्षकवृंद सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संचालन प्रा. आर. एस. कोल्हे तर आभार प्रा. डॉ. आर. पी. करोडकर यांनी मानले. प्रियंका हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. एस. गडपल्लीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून व्ही. डब्ल्यू. हुलके, पी. डब्ल्यू. चुधरी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. संचालन सी. एन. नंदनवार तर आभार एस. एल. गायकवाड यांनी मानले. जि. प. प्राथमिक शाळा, काटेपल्ली : साक्षरता दिन कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष लालशाही आत्राम, संंगीता मडावी, मुख्याध्यापक प्रकाश उरेते, दोंतुलवार, पूनम सिडाम उपस्थित होत्या. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, इंदाराम : साक्षरता दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शाळेतून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर गावात फिरवून शाळेत समारोप करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका डी. वाय. ढवस, पोलीस पाटील सदाशिव दुर्गे, पशुधन विकास अधिकारी डॉ. चंद्रकांत लहा भटे उपस्थित होते. जिल्हा साक्षरता समिती, गडचिरोली : साक्षरता दिनानिमित्त जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे होते. उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, समाजकल्याण सभापती विश्वास भोवते उपस्थित होते. प्रास्ताविक निरंतर शिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी केले. दरम्यान प्रकाश गेडाम, यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संदेशाचे वाचन केले. दरम्यान घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, गीतगायन स्पर्धेत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेडकर, मुख्याध्यापक कुंभरे उपस्थित होते. संचालन स्मिता लडके, नंदकिशोर मांडवे तर आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. जे. आत्राम यांनी मानले. पंचायत समिती, एटापल्ली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार संपत खलाटे होते. यावेळी प्राचार्य पराते, विस्तार अधिकारी कोकुडे, शेख, बुद्धावार उपस्थित होते. विविध स्पर्धेतील सुयश प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. संचालन श्रीरामे तर आभार येरागडे यांनी मानले. जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा : साक्षरता दिन कार्यक्रमाला मुख्याध्यापिका बी. जी. मडावी, गौतम डांगे, प्रा. तुंगीडवार, प्रा. रश्मी डोके, लाकडे, चलाख, कोहाडे, नारनवरे, उके, कोल्हटकर उपस्थित होते. साक्षरता दिनानिमित्त गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन विजय साळवे तर आभार तोटावार यांनी मानले. जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वासाळा : साक्षरता दिनानिमित्त ग्रंथदिंडी गावातून काढण्यात आली. त्याचबरोबरच रांगोळी, भावगीत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमात सुयश पटकाविणाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी सरपंच प्रकाश जोंजाळकर, उपसरपंच बायजा मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य मंगला इन्कने, सुशांक मंडल, अमित आलबनकार, ग्रा. पं. सदस्य रामदास जौंजाळकर, पूनमचंद मेश्राम, योगाजी रामटेक, छाया उईके, विठोबा भोयर, देवनाथ मंगरे, कबीर रामटेके, वैशाली मेश्राम उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका संगीता लिंगायत, प्रमोद सेलोकर, अविनाश वऱ्हाडे, धनराज वैद्य, वैशाली धाईत, सोनाली कापकर यांनी सहकार्य केले. श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल, गोगाव : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पोरेड्डीवार होत्या. यावेळी प्रा. उराडे व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये साक्षरतेविषयी जनजागृती करावी, तसेच समाजात साक्षरतेचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन करण्यात आले. संचालन कढव तर आभार जंगावार यांनी मानले.