शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीला 'स्टील हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:44 IST

अर्थसंकल्पात 'स्टील हब'ची घोषणा : आरमोरीत रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकासासाठी १० मार्च रोजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. जिल्ह्याला 'स्टील हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या खणिकर्म महामार्गासाठी (मायनिंग कॅरिडॉर) सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा राज्याचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा आहे, या जिल्ह्याला स्टील हब बनविणार, अशी घोषणा मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केलेली आहे. अर्थसंकल्पात त्यावर शिक्कामोर्तब करतानाच दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खणिकर्म महामार्गसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय, आरमोरी येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे. 

दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गडचिरोलीसाठी २१,८३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून ७५०० नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. गडचिरोलीत नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे सुरू झाली आहेत. यामुळे जिल्ह्यात उद्योजकांचे रेलचेल वाढेल. याचा फायदा उद्योगांच्या विस्तारासाठी होईल.

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या या निर्णयांचे स्वागत करतो, असे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे निवासी संचालक विक्रम मेहता यांनी सांगितले. ६२०० कोटींची गुंतवणूक कोनसरी येथील पोलाद निर्मितीसाठी केली. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ जानेवारीला या कामाचा प्रारंभ केला.

८३ किमी लांबीचा खणिकर्म महामार्गदक्षिण गडचिरोलीतील सूरजागड टेकडीवर दोन-तीन वर्षापासून लोहखनिज उत्खनन सुरू आहे. या अवजड वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण मिळू नये, यासाठी तोडगा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मायनिंग कॉरिडॉर' निर्माण करण्याची घोषणा केली होती. यानुसार नवेगाव मोर ते सूरजागड ८३ किमी लांबीच्या 'ग्रीनफील्ड' विशेष महामार्गाला मान्यता मिळालेली असून खणिकर्म महामार्गामुळे अपघात थांबतील व या भागातील नागरिकांना या वाहतुकीचा कुठलाही त्रास होणार नाही.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीBudgetअर्थसंकल्प 2024