शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काळे झेंडे दाखवत व्यक्त केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

तेलंगणा सरकारने उभारलेल्या या प्रकल्पासाठी राज्यात सत्तारूढ असलेल्या तत्कालीन भाजप सरकारने सर्व प्रकारची मदत केली होती. आता भाजपचेच पदाधिकारी या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आंदोलनाची भूमिका घेत असल्याने हा या भागात चर्चेचा विषय झाला आहे. काही दिवसांपूर्वीच आ.डाॅ.देवराव हाेळी यांनीही हा प्रकल्प पांढरा हत्ती असल्याची टीका केली हाेती.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारने तीन वर्षांपूर्वी गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा बॅरेज या भव्य सिंचन प्रकल्पाचे पाणी महाराष्ट्राच्या हद्दीतील लगतच्या शेतांमध्ये शिरून दरवर्षी जमीन खरडून निघत आहे. या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाईसुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे १ मे या महाराष्ट्र दिनी शेतकऱ्यांनी धरणाच्या परिसरात काळे झेंडे दाखवीत निषेध नोंदविला. ८५ दरवाजे असणाऱ्या या प्रकल्पाचे पाणी हैदराबादपर्यंत नेले जात असले तरी प्रकल्पाला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या पिकासाठी थेंबभरही पाणी मिळत नाही. मात्र, धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर बॅकवॉटर लगतच्या शेतांमध्ये शिरून मोठे नुकसान होते. याकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांच्या नेतृत्वात सीमावर्ती गावातील शेतकऱ्यांनी रविवारी सायंकाळी काळे झेंडे दाखवीत घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. पीडित शेतकऱ्यांना लांबपल्लीच्या धर्तीवर भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. सदर प्रश्नांबाबत शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.

भाजपचाच पाठिंबा, भाजपकडूनच निषेध -    तेलंगणा सरकारने उभारलेल्या या प्रकल्पासाठी राज्यात सत्तारूढ असलेल्या तत्कालीन भाजप सरकारने सर्व प्रकारची मदत केली होती. आता भाजपचेच पदाधिकारी या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आंदोलनाची भूमिका घेत असल्याने हा या भागात चर्चेचा विषय झाला आहे.-    काही दिवसांपूर्वीच आ.डाॅ.देवराव हाेळी यांनीही हा प्रकल्प पांढरा हत्ती असल्याची टीका केली हाेती.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी