लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/देसाईगंज : ‘माझे अंगण, माझे रणांगण’ या मोहिमेअंतर्गत भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली शहर व देसाईगंज येथे शुक्रवारी महाराष्ट्र बचाव आंदोलन करून कोरोनाविरूद्धच्या लढाईत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत निषेध करण्यात आला.गडचिरोली येथे खा.अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आ.डॉ.देवराव होळी यांच्या कार्यालयासमोर भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. देसाईगंज येथील मुख्य चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपचे तालुकाध्यक्ष राजु जेठाणी,रामरतन मेश्राम, प्रमोद नैताम, संतुमल शामदासानी, लालाजी रामटेके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वीज बिल माफ करा, शाळेचे शुल्क रद करा, मोफत बि - बियाणे मोफत पुरविण्यात यावे आदी मागण्या ेरण्यात आल्या.गडचिरोली येथे खा.अशोक नेते यांच्या कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, गोविंद सारडा, जि.प.सदस्य रणजिता कोडापे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, न.प.पाणी पुरवठा सभापती वैष्णवी नैताम, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, महिला व बालकल्याण सभापती लता लाटकर, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक केशव निंबोड, महिला शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे आदी उपस्थित होते. यावेळी फिजिकल डिस्टन्स ठेवून हे आंदोलन करण्यात आले.महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात अपयशी ठरले आहे. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजूर, श्रमीक व कामगारांना स्वत:च्या जिल्ह्यात आणण्यात सरकारला यश आले नाही. परिणामी अनेक मजूर, विद्यार्थी, कामगारांना हजारो किमी पायी प्रवास करावा लागला. क्वॉरंटाईन केलेल्या लोकांची योग्यरित्या व्यवस्था केली नाही, असे आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.
राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST
गडचिरोली येथे खा.अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आ.डॉ.देवराव होळी यांच्या कार्यालयासमोर भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. देसाईगंज येथील मुख्य चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन
ठळक मुद्देकाळ्याफिती व काळे मास्क लावले : भाजपतर्फे गडचिरोली व देसाईगंजात महाराष्ट्र बचावचा नारा