शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

विनयभंगप्रकरणी तिघांच्या निलंबनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:59 AM

येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुख्याध्यापक ए.एन.मेश्राम, अधीक्षक आर.एन.काळे, अधीक्षिका एन.जे.ठाकरे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रभारी प्रकल्प अधिकारी धोटे यांनी वरिष्ठांकडे पाठविल्याचे प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देपेरमिलीत चक्काजाम : मुख्याध्यापक, अधीक्षक व अधीक्षिकेवर होणार कारवाई; पालकमंत्र्यांनी घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कपेरमिली : येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुख्याध्यापक ए.एन.मेश्राम, अधीक्षक आर.एन.काळे, अधीक्षिका एन.जे.ठाकरे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रभारी प्रकल्प अधिकारी धोटे यांनी वरिष्ठांकडे पाठविल्याचे प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठी मंगळवारी पेरमिली येथे बाजारपेठ बंद ठेवून चक्काजाम आंदोलनसुद्धा करण्यात आले.शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा पाच जणांनी विनयभंग करून मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याची घटना रविवारी घडली. पीडित मुलगी याच आश्रमशाळेतील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत जंगलात फिरायला गेली होती. झालेल्या प्रकाराची तक्रार पेरमिली पोलीस स्टेशनमध्ये दाखल गेल्यानंतर ठाणेदार महेश मधुकर यांनी पाच आरोपींना तत्काळ अटक करून गुन्हा दाखल केला.दरम्यान या घटनेचा पेरमिलीवासीयांनी निषेध करीत मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवली. त्याचबरोबर पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, कैलास कोरेत यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. आश्रमशाळेसमोर सुद्धा निदर्शने केली. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पेरमिली गाठून आंदोलनकर्त्यांची समजून काढली.निवासी आश्रमशाळा असताना एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बाहेर जाते कशी, या कारणावरून हलगर्जीपणाचा ठपका ठेवत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व अधीक्षिका यांना निलंबित करावे, असे आदेश आदिवासी विकास राज्यमंत्री या नात्याने त्यांनी प्रकल्प अधिकारी यांना दिले. त्यानुसार प्रकल्प अधिकाºयांनी प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाने लोकमतला दिली आहे.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम