शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

दुर्गम भागासाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 20:52 IST

विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे रुग्णांसाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांकडे पाठविला होता, मात्र परिवहन विभागाने त्या पद्धतीची अ‍ॅम्ब्युलन्स नियमात बसत नसल्याचे सांगितल्यामुळे आरोग्य संचालकांनी तो प्रस्ताव नामंजूर केला.

ठळक मुद्देआरोग्य संचालकांना अमान्य रस्ते आणि पुलाशिवाय पर्याय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते आणि पुलांअभावी रुग्णांचे होत असलेले हाल आणि त्यामुळे अनेकांवर जीव गमवावा लागण्याची वेळ येण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे रुग्णांसाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांकडे पाठविला होता, मात्र परिवहन विभागाने त्या पद्धतीची अ‍ॅम्ब्युलन्स नियमात बसत नसल्याचे सांगितल्यामुळे आरोग्य संचालकांनी तो प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे या भागात आता चांगले रस्ते आणि पुलांची उभारणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

दुर्गम भागात रस्ते निर्मितीच्या बाबतीत नक्षलवाद्यांचे अडथळे, वन कायद्याच्या अडचणी या दोन प्रमुख अडचणी आहेत. त्यावर मात करून प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरून पुढाकार घेतल्यास रस्ते-पुलांची अडचण दूर होऊ शकते. मात्र वर्षानुवर्षे त्याबाबत उदासीनता कायम राहिल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सरकारी रुग्णवाहिका गावात जात नाही. पर्याय म्हणून बुलेटसारख्या मजबूत बाईकला तीनचाकी बनवून रुग्णाला मागील सीटच्या बाजुला तयार केलेल्या जागेत बसवून आणल्यास रुग्णांचा पायी चालण्याचा किंवा खाटेची कावड करून त्यावरून आणण्याचा त्रास वाचू शकतो म्हणून बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाने दिला होता. त्यासाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्सच्या विविध मॉडेल्सचीही माहिती दिली होती, परंतू तो त्याबाबतचा प्रस्ताव अमान्य करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार